मुंबई: गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी अनेक लोक दागिन्यांच्या दुकानात गर्दी करत आहेत. जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याचा दर काहीसा कमी झाला आहे. आज चांदीचे दर 2400 रुपयांनी घसरले आहे आणि सोन्याचे दर 365 रुपयांनी घसरले आहे. 8 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 1 हजार रुपये होती. त्यानंतर, सोन्याची किंमतीत 2603 रुपयांची घट झाली आहे. सराफा बाजारात एक तोळा 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 1 हजार 767 रुपये आहे.
यासह, 24 कॅरेट सोन्याचा भाव 365 रुपयांनी कमी झाला आहे आणि चांदीचा भाव 2400 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 11 हजार 225 रुपये प्रति किलो झाला आहे. आयबीजेएच्या दरांनुसार, जीएसटी वगळून चांदीचा दर 1 लाख 13 हजार 625 रुपये प्रति किलो आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 99 हजार 168 रूपये आहे.
23 कॅरेट सोन्याचा भावही 365 रुपयांनी घसरून 98 हजार 4-7 रुपयांवर आला आहे. जीएसटीसह, सोन्याची किंमत 1 लाख 1 हजार 359 रुपये प्रति तोळा आहे. ही किंमत मेकिंग चार्जेस वगळून आहे. यासह, 22 कॅरेट सोन्याचा भाव 334 रुपयांनी घसरून 90 हजार 504 रुपये प्रति तोळा झाला आहे. हा दर जीएसटीसह 93 हजार 219 रुपये आहे आणि 18 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या किंमतीत 274 रुपयांची घसरण होऊन तो 74 हजार 102 रुपये झाला आहे.
हेही वाचा: Pune Water Logging: पुण्यातील एकता नगर सोसायटीमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची तारांबळ
अहमदाबादमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत - 1,01,860 रुपये आहे.
अमृतसरमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत - 1,01,570 रुपये आहे.
बेंगळुरूमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत - 1,01,950 रुपये आहे.
भोपाळमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत - 1,01,570 रुपये आहे.
चेन्नईमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत - 1,01,850 रुपये आहे.
दिल्लीमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत - 1,01,540 रुपये आहे.
फरीदाबादमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत - 1,01,470 रुपये आहे.
हैदराबादमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत - 1,01,820 रुपये आहे.
मुंबईमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत - 1,01, 545 रुपये आहे.