भंडारा: डॉक्टरने सोनोग्राफीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडाऱ्यातील साकोली शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये 17 वर्षीय मुलीसोबत एकांतात विकृत प्रकार केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन डॉक्टरविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी डॉक्टर फरार असल्याची माहिती मिळत आहे.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवेश अग्रवाल असे डॉक्टरचे नाव असून सदर मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास अश्लील चाळे केले असल्याचा गंभीर आरोप मुलीने आहे. घडलेली घटना पीडितेने आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. साकोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन डॉ. देवेश अग्रवाल याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. डॉ. देवेश अग्रवालचे वय 45 असून तो सौंदड येथे राहतो. आरोपी डॉक्टर अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मात्र साकोली शहरात या घटनेमुळे संतापाची लाट पसरली आहे.
हेही वाचा: नागपुरात सुशिक्षित तरुणींमध्ये स्कूटर चोरण्याचा ट्रेंड; नेमकं प्रकरण काय?
अल्पवयीन मुलीसोबत डॉक्टरने केले अश्लील चाळे
भंडारा जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीसोबत हॉस्पिटलमध्ये अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. साकोली शहरातील श्याम हॉस्पिटलमधील डॉ. देवेश याने या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. संबंधित मुलीच्या आईला व नर्सला बाहेर बसायला सांगून हा डॉक्टर अर्धा तास मुलींसोबत अश्लील चाळे करत होता. हॉस्पिटलहून घरी आल्यानंतर मुलीने संपूर्ण प्रकार आई आणि वडिलांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. साकोली पोलिसांनी या प्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल केला असून आरोप डॉक्टर देवेश फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
दरम्यान या घटनेमुळे परिसरात संताप निर्माण झाला आहे. तसेच आपण डॉक्टरला देव मानतो. त्यामुळे डॉक्टरांकडून असे प्रकार घडणे अत्यंत चुकीचे आहे. या घटनेमुळे डॉक्टरवर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच हॉस्पिटलच्या कामकाजावर प्रश्वचिन्ह निर्माण केले जात आहे.