भिवंडी: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये वारंवार वाढ होताना दिसत आहे. सध्या याच घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भिवंडीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पती कैलास हरड याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. छकुली बाळकृष्ण केदार असे या विवाहितेचे नाव असून तिने गळफास घेतला आहे. छकुली नामक महिलेकडे सासरच्या लोकांकडून सातत्याने पैशांची मागणी होत होती. याच जाचाला कंटाळून छकुलीने आत्महत्या केली.
हेही वाचा: Balasore Sexual Harassment Case: आत्मदहनानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
नेमकं प्रकरण काय?
मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील पिंपळघर गावातील छकूली बाळकृष्ण केदार हिचा विवाह शहापूर तालुक्यातील खरीवली गावातील रहिवासी कैलास हरड याच्यासोबत दोन महिन्यापूर्वी झाला होता. छकुलीचा पती ब्लॉक घेण्यासाठी नेहमी तिला सांगत असे की तु तुझ्या बापाकडून 20 लाख घेऊन ये. त्यावर माझे वडील वडापावची गाडी चालवतात. त्यांच्याकडून ऐवढे पैसे कुठून मिळतील असे छकुलीने म्हटले होते. ही संपूर्ण माहिती मृत छकुलीची आई रंजना केदार यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी मृत छकुलीच्या कुटुंबियांनी घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर किन्हवली पोलिसांना पती कैलास हरड यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या प्रकरणाती अधिकचा तपास किन्हवली पोलिस करत आहेत.
भिवंडीतील शहापूर तालुक्यातील खरीवली गावात एका विवाहितेने सासरच्या लोकांना कंटाळून स्वत:चा जीव गमावला आहे. ब्लॉक घेण्यासाठी तिच्या वडिलांकडून 20 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. छकुलीचे वडील वडापावची गाडी चालवतात. वडापाव विकून ते 20 लाख रुपये कुठून आणणार असे छकुलीने तिच्या सासरच्या लोकांना सांगितले. मात्र त्यांनी तिचे काहीच ऐकले नाही. हा संपूर्ण प्रकार तिने तिच्या आईला देखील सांगितला होता. सासरचे सतत पैशांची मागणी करत राहिले. याच छळाला कंटाळून एक दिवस छकुलीने स्वत:ला संपवलं.