मुंबई: मुंबईतील आरे कॉलनीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना आरे कॉलनीतील छोटा कश्मीर उद्यान परिसरात घडली आहे. या प्रकरणी, पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या भावाला अटक केली आहे. या घटनेमुळे, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात कोकणात जाणार असाल तर इकडे लक्ष द्या; 23 ऑगस्टपासून वाहतुकीत होणार मोठे बदल
नेमकं प्रकरण काय?
बऱ्याच कालावधीपासून पत्नी राजश्री भरत अहिरे आणि पती भरत लक्ष्मण अहिरे यांच्यात वाद सुरू होता. वादाला कंटाळून, 12 जुलैला रात्री पत्नी राजश्री अहिरेने प्रियकर चंद्रशेखर आणि भाऊ रंगा या दोघांना फोन केला आणि घरी बोलावले. त्यांनी भरतला जीवे मारण्याचा कट रचला. या दरम्यान राजश्रीने पती भरतला शौचालयाजवळ बोलावले. तेव्हा, राजश्रीचा प्रियकर चंद्रशेखर आणि भाऊ रंगाने पती भरतला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे, पती भरतच्या पोटातील नस तुटली. यासह, छातीची हाडे तुटली आणि लिव्हरचे खूप नुकसान झाले.
या घटनेनंतर, अर्धमेल्या अवस्थेत राजश्रीने पती भरतला धमकी दिली की, जर त्याने कोणाला सांगितले तर मुलांनाही मारून टाकेल. इतकच नाही, तर पत्नी राजश्रीने त्याला तीन दिवस घरात लपवून ठेवले. जेव्हा भरतची प्रकृती बिघडली तेव्हा, 16 जुलै रोजी भरतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर 5 ऑपरेशन करण्यात आले. मात्र, भरतचे प्राण वाचू शकले नाही. अखेर, 5 ऑगस्ट रोजी सकाळी भरतचा अंत झाला.
या घटनेत एक नवीन ट्विस्ट आला आहे. मृत पती भरतची मुलगी श्रेयाने (वय: 12) या घटनेची माहिती पोलिसांना दिली. श्रेया म्हणाली की, 'आईने बाबांना शौचालयाजवळ बोलावले, जिथे आईचा प्रियकर चंद्रशेखर आणि भाऊ रंगाने बाबांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे, बाबांच्या पोटातील नस तुटली, छातीची हाडे तुटली आणि लिव्हरचे खूप नुकसान झाले'.
हेही वाचा: Sanjay Gaikwad : 'उद्धव ठाकरेंच्या बापालाही...'; संजय गायकवाडांचा 'त्या' विधानावरुन यू-टर्न
राजश्रीला बेड्या ठोकल्या
'मागील काही दिवसांपासून पती भरत अहिरे आणि पत्नी राजश्री यांचा वाद सुरू होता. ही घटना पत्नी राजश्रीच्या 2 मुली आणि 3 वर्षांच्या मुलाने पाहिली. यानंतर, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली. जेव्हा, नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा राजश्री म्हणाली की, 'दुचाकी अपघातात भरत जखमी झाला आहे'. मात्र, पोलिसांना पत्नी राजश्रीच्या दाव्यावर शंका आली. जेव्हा या घटनेबाबत पोलिसांनी मुलांशी संवाद साधला तेव्हा गुपित बाहेर आले. 5 ऑगस्ट रोजी भरतचा मृत्यू झाला. तेव्हा, पोलिसांनी राजश्रीला (वय: 35) हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणि पतीला जीवे मारल्याच्या आरोपाखाली केली असून राजश्रीचा भाऊ रंगाला बेड्या ठोकले आहे आणि राजश्रीचा प्रियकर चंद्रशेखर अजूनही फरार आहे.