नागपूर: नागपुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुजोर भोंदूबाबाने नग्न पूजेचा व्हिडीओ एका महिलेला पाठवला आहे. हबिबुल्ला मलिक असं या भोंदूबाबाचं नाव आहे. या प्रकरणात मुजोर भोंदूबाबा हबिबुल्ला याला अटक करण्यात आली आहे.
नग्न पूजेचा व्हिडीओ दाखवत महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या हबिबुल्ला मलिक उर्फ मामा या भोंदूबाबावर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हबिबुल्ला मलिक उर्फ मामा हा मूळचा पश्चिम बंगाल येथील आहे. मात्र गेल्या वीस वर्षापासून नागपुरात फसवणुकीचा धंधा करत आहे. त्याच्यावर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा: Ahilyanagar Crime : धक्कादायक ! अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह ; पतीला अटक, मेहुणा फरार
नेमकं प्रकरण काय?
कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी महिलेसोबत ओळख वाढवून घरात प्रवेश मिळवला आणि मी काळी जादू जाणतो म्हणून महिलेला नग्न पूजा करत व्हिडीओ पाठविला. भोंदूबाबा गेल्या अनेक दिवसांपासून सदर महिलेसोबत अश्लील कृत्य करत होता. तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. मात्र महिलेने हिंमत दाखवत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करत भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. सदर भोंदूबाबा त्याच्या भागात मामा म्हणून प्रसिद्ध आहे. कष्टकरी व गरीब लोक त्याच्या टार्गेटवर असायचे. तो नेहमी साधारण चहा टपरीवर थांबायचा. तेथे लोक घरातील समस्या बोलत असताना, मी काळी जादू करतो म्हणून त्यांना हेरायचा.
नागपुरात भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हबिबुल्ला मलिक उर्फ मामा असे आरोपी भोंदूबाबाचे नाव असून तो मूळचा पश्चिम बंगाल येथील आहे. त्याने नग्न पूजेचा व्हिडीओ दाखवत महिलेसोबत अश्लील कृत्य केले. यानंतर महिलेने हा संपूर्ण पोलिसात सांगितला. मागील वीस वर्षांपासून नागपुरात काळी जादू करतो, असे सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबावर नागपूरातील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.