कविता लोखंडे. प्रतिनिधी. नवी मुंबई: नवी मुंबईतील रबाळे तलावात एका 25 वर्षीय तरुणाने उडी मारत जीवन संपवल्याची बातमी समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न करता रबाळे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. नेमकं कोणत्या कारणामुळे, या मुलाने जीवन संपवले असावे? याचा तपास सध्या रबाळे पोलीस करत आहेत. या घटनेमुळे, रबाळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: 'ऑपरेशन सिंदूर'ला तमाशा म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेंवर भाजपचा संताप उफाळला
प्राथमिक माहितीनुसार, मागील काही वर्षांपासून मृत तरूण एका विवाहित महिलेच्या प्रेमात होता. या प्रेम प्रकरणातून तरूणाने अखेर जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. इतकच नाही, तर या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात हा तरुण नवी मुंबईतील रबाळे तलावात उडी मारत आहे, असा क्षण सीसीटीव्हीत कैद झाला आहे.