Wednesday, August 20, 2025 09:26:29 AM

Airtel Network Down : एअरटेल गंडलं ! ना कॉल, ना मेसेज ; वापरकर्त्यांचा संताप, कंपनीकडून ग्राहकांना उत्तर

एअरटेल टेलिकॉम कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही तासांपासून एअरटेल सिमकार्ड वापरकर्त्यांना कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत.

airtel network down  एअरटेल गंडलं  ना कॉल ना मेसेज  वापरकर्त्यांचा संताप कंपनीकडून ग्राहकांना उत्तर

दिल्ली: एअरटेल टेलिकॉम कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही तासांपासून एअरटेल सिमकार्ड वापरकर्त्यांना कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे, अनेक वापरकर्त्यांनी एअरटेलची सेवा बंद पडली अशी माहिती सोशल मीडियावर शेअर केली. विशेष म्हणजे, या घटनेनंतर, स्वत: एअरटेलनेही सोशल मीडियावर पोस्ट करून, 'शक्य तितक्या लवकर ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत', अशी माहिती दिली. 

'या' ठिकाणी आहेत एअरटेलचे नेटवर्क डाऊन

दिल्ली एनसीआर, जयपूर, कानपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता येथील एअरटेल वापरकर्त्यांना कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे, अनेक वापरकर्त्यांनी एअरटेलची सेवा बंद पडली अशी माहिती सोशल मीडियावर शेअर केली.

हेही वाचा: Maharashtra Rain Update : मोठा निर्णय! अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर; 'या' जिल्ह्यांमध्ये शाळा राहणार बंद, जाणून घ्या

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 4 वाजल्यापासून एअरटेल वापरकर्त्यांना कनेक्टिव्हिटीच्या समस्या येत होत्या. याबाबत, 2 हजार पेक्षा अधिक वापरकर्त्यांनी एअरटेलची सेवा बंद पडली, अशी तक्रार नोंदवली. एअरटेल सेवा अचानकपणे बंद पडल्याने, दिल्ली एनसीआर, जयपूर, कानपूर, आदी. शहरातील वापरकर्त्यांना नेटवर्क आणि इंटरनेटच्या समस्यांचा सामना करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी अशी तक्रार केली की, कॉल कट होणे, पूर्णपणे सिग्नल गायब होणे आणि इंटरनेटचा वेग मंदावणे अशा अनेक समस्या होत आहेत. त्यामुळे, एअरटेल वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

यावर, एअरटेल केअर्सने एका वापरकर्त्याला उत्तर दिले की, 'सध्या नेटवर्क आउटेज होत आहे. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आमची टीम प्रयत्न करत आहेत. झालेल्या गैरसोईबाबत आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत'. अचनकपणे, एअरटेल सेवा बंद झाल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. एका वापरकर्त्याने ट्विट केले की, 'हा प्रॉबलेम फक्त माझ्याच फोनमध्ये आहे का? एअरटेल सेवा अजिबात चालत नाही आणि कॉल्स कनेक्ट होत नाही'. 


सम्बन्धित सामग्री