Wednesday, August 20, 2025 04:36:20 AM

Ashish Shelar: मुंबईत जोरदार पाऊस! पावसाचा आढावा घेतल्यानंतर मंत्री शेलार म्हणाले, 'अत्यंत गरज असल्यास...'

भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'सीसीटीव्हीच्या माध्यमातून मी मुंबईतील प्रमुख चौकांबाबत परिस्थितीचा आढावा घेतला', असे शेलार म्हणाले.

ashish shelar मुंबईत जोरदार पाऊस पावसाचा आढावा घेतल्यानंतर मंत्री शेलार म्हणाले अत्यंत गरज असल्यास

मुंबई: मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस आहे. तसेच, मुंबईत धुवाधार पाऊस असल्याने जनजीवन विस्खळीत झाले आहे. यादरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'मुंबई महानगर पालिका प्रशासन, मुंबई पोलीस असो, इतर यंत्रणा असो किंवा त्यांचे अधिकारी हे ऑन-साईट जागेवर आहेत. उपनगरीय लोकल रेल्वे काही ठिकाणी उशिराने धावत आहेत. मात्र, लोकल रेल्वे पूर्णपणे बंद नाही पडले', अशी माहिती यावेळी शेलारांनी दिली. 

काय म्हणाले आशिष शेलार?

भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले की, 'मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन कक्ष याठिकाणी मी स्वत: आलो. यादरम्यान, मी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख यांच्याकडून मी त्या ठिकाणाची सर्व माहिती घेतली, बैठक घेतली. यासह, सीसीटीव्हीच्या माध्यमातून मी मुंबईतील प्रमुख चौकांबाबत काय परिस्थिती आहे, त्याचा आढावा घेतला'. 

मंत्री शेलार यांनी मुंबईतील प्रमुख चौक, रेल्वे वाहतूक सेवा आणि शाळा-महाविद्यालयांच्या स्थितीचा, आदींचा आढावा घेतला आहे. यादरम्यान, मंत्री शेलारांनी प्रतिक्रिया दिली की, 'मुंबईसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच, शेलार यांनी मुंबईकरांना आवाहन केले की, 'अत्यंत गरज असेल तर घराबाहेर पडावे आणि शक्य असेल तर घरातच सुरक्षित राहावे'. 


सम्बन्धित सामग्री