Wednesday, August 20, 2025 07:38:04 AM

'तू मराठीत बोलू नको', फैझानच्या टोळीचा तरुणावर हॉकीस्टीकने हल्ला; कॉलेजबाहेर मोठा राडा

वाशी येथील एका कॉलेजबाहेर 'तू मराठीत बोलू नको', असं म्हणत फैजन नावाच्या परप्रांतीय मुलाने आणि त्याच्या टोळींनी चक्क हॉकीस्टीकने तरूणावर हल्ला केला.

तू मराठीत बोलू नको फैझानच्या टोळीचा तरुणावर हॉकीस्टीकने हल्ला कॉलेजबाहेर मोठा राडा

नवी मुंबई: मराठी-हिंदी वादावरुन काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच, नवी मुंबईतील वाशीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. वाशी येथील एका कॉलेजबाहेर 'तू मराठीत बोलू नको', असं म्हणत फैजन नावाच्या परप्रांतीय मुलाने आणि त्याच्या टोळींनी चक्क हॉकीस्टीकने तरूणावर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरूण गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. कॉलेजमध्ये ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: 'माझ्या वडिलांना अडकवण्यासाठी खडसे जबाबदार'; प्रफुल लोढाच्या मुलाने केला खळबळजनक दावा

नेमकं प्रकरण काय?

मराठीत बोलण्याने वाशी येथील एका कॉलेजबाहेर सुरज पवार आणि फैजन नाईक यांच्यात तूफान हाणामारी झाली. या दरम्यान, सुरज मराठीत बोलत असल्याने फैजन नाईक आक्रमक होऊन म्हणाला, 'तू मराठी बोलू नको'. मात्र, हा वाद आणखी पेटल्याने आरोपी फैजन नाईक याने आपल्या तीन इतर सहकाऱ्यांना फोन करून कॅालेजच्या बाहेर बोलवले आणि फैजनने सुरज पवारला हॅाकीस्टीकने मारहाण केली. तसेच, फैजनच्या इतर तीन साथीदारांनी सुरजला लाथाबुक्यांनी मारले. या घटनेत जखमी झालेल्या सुरज पवारला तात्काळ उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी, आरोपी फैजान नाईक आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनसेनी अशी मागणी केली आहे की, 'पोलिसांनी आरोपींना पाठीशी न घालता त्यांना योग्य ती समज द्यावी'.


सम्बन्धित सामग्री