अहमदनगर: पाथर्डी तहसील कार्यालयात लाच घेताना एक तलाठी आणि त्याचा खाजगी सहाय्यकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी सतीश रखमाजी धरम (वय 40, पाथर्डी) आणि खाजगी सहाय्यक अक्षय सुभाष घोरपडे (वय 27, शेवगाव) यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने घेतली थेट ACB ची मदत -
पीडित तरुणाने लाच देण्यास नकार देत अहिल्यानगर येथील ACB कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर ACB पथकाने प्राथमिक पडताळणी करून तहसील कार्यालयात सापळा रचला. साध्या वेशातील ACB अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात सापळा लावून तलाठी धरम याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. संपूर्ण व्यवहार ब्युरोच्या अधिकाऱ्यांच्या नजरेखाली पार पडला.
हेही वाचा - Nagpur Crime : 'लुटेरी दुल्हन'कडून 8 पेक्षा अधिक नवरदेवांची फसवणूक, खोटारड्या नवरीचा पर्दाफाश
तलाठ्यावर गुन्हा दाखल -
दरम्यान, पाथर्डी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक भरत तांगडे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात रवी निमसे, बाबासाहेब कराड आणि पी. एच. हारून शेख सहभागी होते.