Sunday, August 31, 2025 09:57:59 PM

अनैतिक प्रेमसंबंधातून पत्नीने केला मर्चंट नेव्ही ऑफिसर पतीचा गेम

विश्वासघाताने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना घडली आहे.

अनैतिक प्रेमसंबंधातून पत्नीने केला मर्चंट नेव्ही ऑफिसर पतीचा गेम

मुंबई : विश्वासघाताने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना घडली आहे. पत्नीने आपल्या प्रियकरांसोबत मिळून मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेल्या पतीचा खून केली धक्कादायक घटना घडली आहे. 

पत्नीने मर्चंट नेव्ही ऑफिसर पतीचा खून करून मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि त्यानंतर ड्रममध्ये सीमेंट भरून लपवण्यात आला. मात्र दुर्गंधी पसरल्याने खुनाचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांनी बायको आणि तिच्या प्रियकराला अटक केली. 

हेही वाचा : Nagpur Violence: अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाचा विनयभंग

नक्की काय घडलं?
२९ वर्षीय सौरभ राजपूत आणि मुस्कान यांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला. दोघांच्या कुटुंबाचा विवाहाला विरोध असल्यामुळे सौरभ आणि मुस्कान यांनी परस्पर प्रेमविवाह केला. ते मेरठच्या इंद्रनगरमध्ये वेगळे राहू लागले. त्यांना तीन वर्षाची एक मुलगी आहे. सौरभ आपल्या कुटुंबासाठी मेहनतीने काम करत होता. मात्र मुस्कानने संसारात विष पेरले. मुस्कानचे बाहेर प्रेमसंबंध सुरू होते. तिच्या आयुष्यात साहिल नावाचा तरूण आला आणि तिने संसारात विष पेरण्यास सुरूवात केली. साहिल आणि मुस्कानने मिळून सौरभला संपवण्याचा कट रचला. दरम्यान ४ मार्चच्या रात्री सौरभ घरी असताना मुस्कान आणि साहिलने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. सौरभवर चाकूने वार करत त्याला निर्दयीपणे ठार करण्यात आले. पण यावर दोघे शांत राहिले नाहीत. तर त्यांनी सौरभच्या शरीराचे १५ तुकडे केले आणि एका ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट ओतून लपवले.


मुस्कानने सौरभच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबाला खोटे मेसेजेस पाठवले. सौरभच्या कुटुंबाची दिशाूल करण्यासाठी मु्स्कानने खालची पातळी ओलांडली. त्यानंतर मुस्कान आणि साहिल हिल स्टेशनवर सुट्टीसाठी निघून गेले. मात्र काही दिवसांनी सौरभच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली. पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी इंद्रानगरमधील त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली आणि मुस्कान व साहिलला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनीच सौरभच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे सांगितले. पोलिसांनी लपवलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. आता मुस्कान आणि साहिल दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण मुस्कानच्या विश्वासघाताने एका निष्पाप जीव गमावला आणि एका चिमुरड्याचे आयुष्य उद्धवस्त झाले. 


सम्बन्धित सामग्री