Monday, September 01, 2025 01:41:32 AM

March For Australia: ऑस्ट्रेलियात भारतीयांविरुद्ध संतापाचा उद्रेक! हजारो लोक रस्त्यावर उतरले; अनेक शहरांत निदर्शने

‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’ या नावाने काढलेल्या या रॅलीत भारतीय स्थलांतरितांनाही खासकरून लक्ष्य करण्यात आले. सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा यांसारख्या प्रमुख शहरांत निदर्शने झाली.

march for australia ऑस्ट्रेलियात भारतीयांविरुद्ध संतापाचा उद्रेक हजारो लोक रस्त्यावर उतरले अनेक शहरांत निदर्शने

March For Australia: रविवारी ऑस्ट्रेलियात हजारो लोक रस्त्यावर उतरून स्थलांतरविरोधी रॅलींमध्ये सहभागी झाले. ‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’ या नावाने काढलेल्या या रॅलीत भारतीय स्थलांतरितांनाही खासकरून लक्ष्य करण्यात आले. सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा यांसारख्या प्रमुख शहरांत निदर्शने झाली. सरकार आणि सर्व राजकीय पक्षांनी या घटनांचा निषेध केला. निदर्शनाच्या प्रचारात्मक साहित्यामध्ये भारतीय स्थलांतरितांचा उल्लेख ठळकपणे करण्यात आला. एका पत्रकात लिहिले होते की, गेल्या पाच वर्षांत आलेल्या भारतीयांची संख्या 100 वर्षांत आलेल्या ग्रीक व इटालियन लोकांपेक्षा जास्त आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातील सांस्कृतिक रचनेत मोठा बदल होत असल्याचे निदर्शकांचे म्हणणे आहे. सध्या भारतीय स्थलांतरित देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 3 टक्के आहेत.

सिडनीतील रॅलीत 5 हजार ते 8 हजार लोकांनी सहभाग घेतला, ज्यात अनेकांनी राष्ट्रीय ध्वज हातात घेतले होते. त्याचवेळी रिफ्यूजी अ‍ॅक्शन कोअॅलिशनने प्रतिरॅली आयोजित केली, ज्यात शेकडो लोक सहभागी झाले. मेलबर्नमध्ये निदर्शकांनी फ्लिंडर्स स्ट्रीट स्टेशनसमोर मोर्चा काढला. येथे पोलिस व निदर्शकांमध्ये झटापट झाली. यात सहा जणांना अटक करण्यात आली. 

हेही वाचा PM Modi China Visit: भारत-चीन मैत्री गरजेची; मोदींच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांचे वक्तव्य

काही निदर्शकांनी सार्वजनिक सेवा, घरांच्या किमती आणि रुग्णालयातील प्रतीक्षा वेळ याबाबत असंतोष व्यक्त केला. त्यांचे म्हणणे होते की, मोठ्या प्रमाणात स्थलांतरामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सरकार आणि विरोधी पक्षाने या आंदोलनांचा निषेध करताना त्याला 'द्वेष पसरवणारे' आणि 'नव-नाझींशी जोडलेले' असे संबोधले. संघीय मंत्री मरे वॅट म्हणाले, या रॅली सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी नाहीत, तर समाजात फूट पाडण्यासाठी आहेत. 

हेही वाचा - PM Modi on zelensky : पुतिनना भेटण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचा झेलेन्स्कींशी संवाद, म्हणाले, 'दृष्टीकोन उघड झाला...'

दरम्यान, अॅटर्नी जनरल ज्युलियन लीसर यांनी निदर्शनांतील भारतविरोधी व यहूदीविरोधी भावना चिंताजनक असल्याचे नमूद केले. जवळपास निम्मी लोकसंख्या परदेशात जन्मलेली असलेल्या ऑस्ट्रेलियात गेल्या काही वर्षांत उजव्या विचारसरणीच्या कारवायांत वाढ झाली आहे. सरकारने अलीकडेच द्वेषपूर्ण प्रतीकांचे प्रदर्शन व विक्रीवर बंदी घालणारे कायदे लागू केले असून, उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवासाची तरतूद आहे.


सम्बन्धित सामग्री