मुंबई: टीव्हीवर एखादी मालिका पाहताना तुम्ही जाहिरात तर नक्कीच पाहिली असेल. काही जाहिराती मजेदार असतात, तर काही अविस्मरणीय ठरतात. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की भारतात टीव्हीवर प्रसारित होणारी पहिली जाहिरात कोणती होती? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
मिळालेल्या माहितीनूसार, 1 जानेवारी 1976 रोजी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्वालियर शूटिंग ॲंड फॅब्रिक्स नावाच्या कपड्यांच्या कंपनीची जाहिरात टीव्हीवर प्रसारित झाली होती. ग्वालियर शूटिंग ॲंड फॅब्रिक्स हा एक भारतीय कापड ब्रँड आहे. 1947 मध्ये घनश्याम बिर्ला यांनी रेयॉन्स ॲंड सिल्क मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड नावाच्या कापड ब्रँडची स्थापना केली होती. ही स्वतंत्र भारतातील पहिली गिरणी होती. तसेच, ग्वालियर शूटिंग ॲंड फॅब्रिक्स नावाची ही कंपनी ग्वालिअर येथे आहे.
या जाहिरातींचा उद्देश फक्त उत्पादने विकणे नव्हता, तर लोकांची जीवनशैली बदलणे हा होता. विशेष म्हणजे, जेव्हा ही जाहिरात प्रसारित झाली, तेव्हा बरेच लोक जाहिराती पाहू लागले. त्यानंतर, जाहिरातींची मागणी वाढली आणि त्या माध्यमांसाठी उत्पन्नाचा एक मुख्य स्रोत ठरल्या
'या' कारणामुळे जाहिराती बनवल्या जातात
जाहिराती प्रसारित कारण्यामागील मुख्य कारण म्हणजे, एखाद्या उत्पदनाबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे होय. या जाहिराती विविध भाषांमध्ये प्रसारित केल्या जातात. यामुळे, त्या उत्पदनाबाबत ग्राहकांना माहिती मिळते. विशेष म्हणजे, ज्या माध्यमांवर या जाहिराती प्रसारित केल्या जातात, ते या जाहिराती दाखवून उत्पन्न मिळवतात.