Sunday, August 31, 2025 11:12:18 AM

History Of Dagdusheth Ganpati : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा रंजक इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला जातो. यादरम्यान, गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणून त्यांची विधीवत आणि मनोभावे पूजा करतात.

history of dagdusheth ganpati  पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा रंजक इतिहास तुम्हाला माहित आहे का

पुणे: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला जातो. यादरम्यान, गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणून त्यांची विधीवत आणि मनोभावे पूजा करतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक भाविक मुंबई आणि पुण्यातील विविध गणेश मंडळांना भेट देतात. ज्या प्रकारे मुंबईतील गणपती प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरही खूप लोकप्रिय आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जगभरातून अनेक गणेशभक्त  येतात. पण तुम्हाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा रंजक इतिहास माहित आहे का? चला सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Lalbaugcha Raja First Look : रेखीव डोळे, देखणं रूप ! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर

'हा' आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास

ही गोष्ट 18व्या शतकातील आहे. पुण्यातील बुधवार पेठेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई नावाचे प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी राहायचे. अठराव्या शतकात पुण्यात प्लेगची साथ आली. यात अनेकानी आपला जीव गमावला. प्लेगच्या साथीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे निधन झाले. मुलाच्या निधनामुळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी दु:खी झाले होते. मुलाच्या निधनाच्या काही महिन्यातच, दगडूशेठ त्यांच्या पत्नीला आणि संपत्तीला सोडून गेले. 

आध्यात्मिक गुरू माधवनाथ महाराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची भेट घेतली. तसेच त्यांना धीर देत म्हणाले की, 'काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा, त्यांची विधिवत पूजा करा. आपल्या मुलांप्रमाणेच या देवांचा सांभाळ करा. ज्याप्रकारे भविष्यात आपली मुले आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करतात, अगदी त्याचप्रमाणे हे देव तुमचे नाव मोठे करतील'. 

यानंतर, कुशल कलाकार बालाजी पटोले यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पहिली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केली. 19 फेब्रुवारी 1893 रोजी लोकमान्य टिळक यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना करण्यात आली. स्ध्या, ही मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात आहे. त्यानंतर, 1896 मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली. तेव्हा, हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. सध्या, ही मूर्ती कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे. सध्या जी मूर्ती आपण पाहात आहोत ती गेल्या 50 वर्षाहून अधिक काळापासूनची असून ही मूर्ती तिसरी आहे. ही मूर्ती 5.5 फूट उंच आहे आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली आहे.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री