Monday, September 01, 2025 01:01:18 AM

Maharashtra Weather Updates : सावधान! 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ; 'या' 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यादरम्यान, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

maharashtra weather updates  सावधान 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता  या 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यादरम्यान, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच, 29 ऑगस्ट रोजी हवामान खात्याने कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे, अशा इशारा वर्तवला आहे. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क राहाणं गरजेचं आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यासह, त्यांनी अशी माहिती दिली आहे की, पुढचे 24 तास 10 जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे आहेत.

हवामान खात्याने दिला 'या' जिल्ह्यांना अलर्ट

ऑरेंज अलर्ट: ठाणे, मुंबई, रायगड, रत्नगिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यात, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली.

यलो अलर्ट: पालघर, रायगड, रत्नगिरी, सिंधूदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमधील घाटमाथ्यात, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, वाशिम, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासह, शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. तसेच, समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत संततधार पाऊस राहणार आहे, असा इशाराही हवामान खात्याने वर्तवला आहे. 


सम्बन्धित सामग्री