मुंबई: क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 2008 साली आयपीएलच्या पहिल्याच हंगामात स्टार क्रिकेटपटू हरभजन सिंहने आपल्या ज्युनिअर सहकाऱ्याला म्हणजेच वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला कानशिलात लगावली होती. त्यामुळे, क्रिकेटप्रेमींना धक्का बसला होता. मात्र इतकी वर्षे या घटनेचा व्हिडिओ कोणीही पाहिला नव्हता. तब्बल 17 वर्षानंतर हा व्हिडिओ समोर केल्याने हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ ललित मोदींनी शेअर केल्याने श्रीसंतची पत्नी चांगलीच भडकली आणि तिने मोदींवर सडकून टीका केली.
हेही वाचा: Coolie VS Hridayapoorvam: मोहनलालच्या हृदयपूर्वमने कुलीची हवा टाईट, तीन दिवसांची केली इतकी कमाई
ललित मोदींनी लीक केला 'तो' व्हिडिओ
स्टार क्रिकेटपटू हरभजन सिंहने वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ कोणीच पाहिला नव्हता. मात्र, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कच्या पॉडकास्टमध्ये आपीएलचे पहिले आयुक्त असलेल्या ललित मोदींनी त्या घटनेचा उल्लेख करताना हा व्हिडिओ दाखवला. ललित मोदी म्हणाले की, 'सामना झाल्यानंतर जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हा ब्रॉडकास्टिंगचे सर्व कॅमेरे बंद झाले होते. परंतु, स्टेडियममधील सुरक्षा कॅमेरा सुरू होता आणि या सुरक्षा कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला. तेव्हा, ललित मोदींनी तो व्हिडिओ स्वत:जवळ जपून ठेवला आणि इतक्या वर्षांत कोणालाही दाखवला नाही.
श्रीसंतची पत्नी संतापली
मोदींनी हा व्हिडिओ माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कला दिला. त्यानंतर, क्लार्कने तो व्हिडिओ स्वत:च्या पॉडकास्टवर शेेअर केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतची पत्नी संतापली. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीसंतच्या पत्नीने सोशल मीडियावरून मोदी आणि क्लार्कवर टीका केली.
श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली, ज्यात तिने लिहिले की, 'ललित मोदी आणि मायकेल क्लार्क यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही माणूसच नाही, जे फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि व्ह्यूजसाठी 2008 च्या जुन्या जखमा दाखवत आहेत. श्रीसंत आणि हरभजन दोघेही त्या घटनेपलीकडे बरेच पुढे निघून गेले आहेत. आज श्रीसंत आणि हरभजन सिंह यांची मुले शाळेत जातात, आणि तुम्ही त्यांचे जुने जखम पुन्हा उघडत आहात. हे अत्यंत लज्जास्पद कृत्य आहे. तसेच, ललित मोदी आणि मायकेल क्लार्क यांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्याने त्यांच्या विरेधात गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी कठोर भूमिका श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीने घेतली.