Monday, September 01, 2025 06:48:32 AM

Shaktipeeth Mahamarg Kolhapur : 'सरकारने कोल्हापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला'; शक्तिपीठ महामार्गावरून सतेज पाटील आक्रमक

'सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला', असा आरोप कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी केला आहे. 'याविरोधातील लढा आम्ही तीव्र करणार', असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे.

shaktipeeth mahamarg kolhapur  सरकारने कोल्हापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला शक्तिपीठ महामार्गावरून सतेज पाटील आक्रमक

कोल्हापूर: 'शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरकरांनी विरोध केल्यानंतर, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 'शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन आदेशातून कोल्हापुरला वगळण्यात आले आहे', असा आदेश राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलून कोल्हापुरातून महामार्ग करणार हे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे, सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला', असा आरोप कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी केला आहे. 'याविरोधातील लढा आम्ही तीव्र करणार', असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे. 

हेही वाचा: Devendra Fadanvis On Jarange: 'आंदोलनाला गालबोट लागेल...', मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

काय म्हणाले सतेज पाटील?

कॉंग्रेस आमदार सतेज पाटील म्हणाले की, 'गुरुवारी शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकारने नवीन सरकारी नियम जारी केले, यात कोल्हापूर जिल्ह्यातील नकाशांबद्दलही उल्लेख आहे. महायुतीच्या नेत्यांनी आणि आमदारांनी निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करणाचे आश्वासन दिले होते. मात्र, आजच्या सरकारी नियमातून हे स्पष्ट झाले की महायुतीचे नेते आणि आमदार त्यांच्या शब्दापासूनही मागे हटले आहेत. तसेच, कोल्हापुरला जाणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करणारी जाहीर सूचना या सरकारी नियमाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकार आधीच अडचणीत आहे'. 

'सरकारने अजून लाखो कोटी रुपयांची बिले दिलेली नाहीत. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होईल की नाही? असा संशय आहे. त्यामुळे, आम्ही शांत बसणार नाही. यासह, शक्तिपीठ महामार्गाविरोधात तीव्र आंदोलन करणार', असंही सतेज पाटील म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

28 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला, ज्यामुळे राज्यातील दळणवळण, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. 'शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन आदेशातून कोल्हापुरला वगळण्यात आले आहे', असा आदेश राज्य सरकारने मंजूर केला होता. 

यापूर्वी, शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड आणि आजरा तालुक्यात जमीन संपादन करण्याची योजना सुरू होती. मात्र, शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन राज्य सरकारने हा जाहीरनामा रद्द केला होता. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने कोल्हापुरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, गुरुवारी शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकारने नवीन सरकारी नियम जारी केले, यात कोल्हापूर जिल्ह्यातील नकाशांबद्दलही उल्लेख आहे. त्यामुळे, कॉंग्रेस आमदार सतेज पाटील आक्रमक झाले.


सम्बन्धित सामग्री