मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता अरशद वारसी यांचा बहुचर्चित जॉली एलएलबी 3 या चित्रपटाचा टीझर उद्या, 12 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. त्यामुळे खरा जॉली कोण, याच रहस्य प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. याबाबतची माहिती चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडियीवरून दिली आहे. चित्रपटाच्या टीझरचीही जाहिरात त्यांनी हटके पद्धतीने केली असून, "केस नंबर 1722 की याचिका हुई मंजूर, Jolly फ्रॉम कानपूर ऊर्फ असली Jolly हाजीर है, माय लॉर्ड!," अशी टॅग लाईन सोबत दिली आहे. त्यामुळे खरा जॉली कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
या पूर्वी जॉली एलएलबी आणि जॉली एलएलबी 2 असे चित्रपट प्रदर्श झाले आहेत. यामध्ये पहिल्या भागात अभिनेता अरशद वारसी याने मध्यवर्ती भूमिला साकारली होती. तर दुसऱ्या भागात अभिनेता अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत होता. दोन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे तिसऱ्या भागात दोघांपैकी नेमका जॉली कोण, हे प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्याशिवाय अभिनेते सौरभ शुक्ला, अभिनेत्री हुमा कुरेशी, अमृता राव यांच्याही भूमिका चित्रपटात पाहायला मिळतील. हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.