मुंबई: बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली पूर्व येथील स्काय सिटी प्रकल्पातील आपल्याकडील दोन आलिशान फ्लॅट्स विकले आहेत. मुंबईतील बोरिवली पूर्व भागात असलेल्या एका प्रीमियम निवासी प्रकल्पातील दोन मालमत्ता त्याने 7.10 कोटी रुपयांना विकल्या आहेत. महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी वेबसाइट igrmaharashtra.gov.in आणि स्क्वेअर यार्ड्सच्या रिपोर्टनुसार, हे दोन्ही व्यवहार जून 2025 मध्ये झाले. बोरिवली पूर्व हे मुंबईतील सर्वात पसंतीच्या निवासी क्षेत्रांमध्ये गणले जाते, जिथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मेट्रो लाईन 7 आणि उपनगरीय रेल्वेद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहे.
अक्षय कुमारने विकलेल्या दोन्ही मालमत्ता ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम प्रकल्प स्काय सिटीमध्ये आहेत. हा सुमारे 25 एकरमध्ये पसरलेला एक तयार निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पात 3 बीएचके, 3 बीएचके+स्टुडिओ आणि डुप्लेक्स अपार्टमेंटची श्रेणी आहे. या दोन्ही मालमत्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आहेत. येथे गोरेगाव आणि मालाड सारखे कॉर्पोरेट हब देखील जवळ आहेत. म्हणजेच, या मालमत्ता हिरवळ आणि शहरी जीवनात उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी आहेत.
अक्षय कुमारच्या पहिल्या मालमत्तेची माहिती
अक्षय कुमारने 5.75 कोटींना एक फ्लॅट विकला. त्याचा कार्पेट एरिया 1101 चौरस फूट आहे. फ्लॅटसोबत दोन कार पार्किंग देखील आहेत. अक्षय कुमारने 2017 मध्ये हा फ्लॅट खरेदी केला. यामध्ये 34.50 लाख स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क, 30,000 रुपये भरण्यात आले. इतक्या वर्षांत फ्लॅटची किंमत 90 टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा - Hera Feri 3: परेश रावल यांच्या विरुद्ध ‘हेरा फेरी 3’ टीम; कायदेशीर नोटीसेमुळे वाद शिगेला, नेमकं काय घडलं जाणून घ्या
दुसऱ्या मालमत्तेची माहिती -
दुसरा फ्लॅटचा कार्पेट एरिया फक्त 252 चौरस फूट आहे. अक्षय कुमारने आता तो 1.35 कोटी रुपयांना विकला आहे, जो 2017 मध्ये त्याने फक्त 67.90 लाख रुपयांना खरेदी केला होता. म्हणजेच या फ्लॅटची किंमत 99 टक्क्यांनी वाढली आहे. या मालमत्तेसाठी 6.75 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क जमा करण्यात आले होते.
हेही वाचा - Hera Pheri 3: बाबू भैय्यांना एक्झिट महागात पडली? अक्षयने पाठवली 25 कोटींची लीगल नोटीस; नेमकं काय घडलं जाणून घ्या
दरम्यान, ऑगस्ट 2024 ते जुलै 2025 या कालावधीत स्काय सिटी प्रकल्पात सुमारे 100 व्यवहार नोंदवले गेले असून त्यांची एकूण किंमत 428 कोटी रुपये इतकी होती.तथापी, सरासरी विक्री दर 47,800 रुपये प्रति चौरस फूट होता. केवळ अक्षय कुमारनेच नव्हे, तर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनीही मे 2024 मध्ये याच प्रकल्पात अनेक मालमत्ता खरेदी केल्या असल्याचेही वृत्त आहे.