Wednesday, September 03, 2025 10:52:10 PM

अल्लू अर्जुनवर नेटकरी संतप्त

'पुष्पा २' च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेनगराचेंगरी मध्ये मृत्युमुखी झालेल्या महिलेच्या कुटुंबाला रक्कम देण्याच्या वक्तव्यानंतर नेटकाऱ्यानी अल्लू अर्जुनवर नाराजी व्यक्त केली.

अल्लू अर्जुनवर नेटकरी संतप्त


मुंबई-
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा नवीन प्रदर्शित झालेला 'पुष्पा २' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बराच चर्चेत आहेत. पण, चर्चेत येण्याची अधिकांश कारणे ही नकारात्मक आहेत.अल्लू अर्जुनचा "पुष्पा 2" सिनेमा 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला, पण त्याच दिवशी हैदराबादमधील एका थिएटरमध्ये चेंगराचेंगरीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या दोन मुलांना गुदमरल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. या घटनेनंतर, अल्लू अर्जुनने एक व्हिडिओ शेअर करत माफी मागितली. त्याने म्हटलं की, त्याला एवढी गर्दी होईल याची कल्पनाही नव्हती आणि त्याला दुसऱ्या दिवशी सकाळीच या मृत्यूची माहिती मिळाली. त्याने मृत महिलेच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली.

          या व्हिडिओ नंतर अल्लू अर्जुनला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. काही लोक त्याच्या माफीला खोटी आणि निष्कलंक मानत नाहीत आणि त्याला या परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळण्यात कमीपणा दर्शवला आहे. मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटरविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 105 आणि 118(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "पुष्पा 2" सिनेमा 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला असून, भारतात या चित्रपटाने सुमारे 350 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांची प्रमुख भूमिका आहे. "पुष्पा 2" सध्यातरी अल्लू अर्जुनसाठी डोकेदुखी ठरताना दिसतंय. 

https://x.com/alluarjun/status/1865063351451292062?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1865063351451292062%7Ctwgr%5Ee414cc6c15d4c06e182303ef46458d682f414c50%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fentertainment%2Fnetizens-trolled-allu-arjun-for-not-apologising-for-fan-death-at-pushpa-2-premiere-bollywood-entertainment-marathi-news-1331413


सम्बन्धित सामग्री