Thursday, August 21, 2025 12:00:31 AM

Chhaava Collection : विकी कौशलचा ‘छावा’ ५०० कोटींच्या दिशेने, १६व्या दिवशीही जबरदस्त कमाई!

छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडली आहे. विकी कौशलच्या या चित्रपटाची घौडदौड ५०० कोटी क्बलकडे सुरू आहे. १६व्या दिवशी छावाने २१ कोटींची कमाई केली.

chhaava collection  विकी कौशलचा ‘छावा’ ५०० कोटींच्या दिशेने १६व्या दिवशीही जबरदस्त कमाई
Chhaava Collection : विकी कौशलचा ‘छावा’ ५०० कोटींच्या दिशेने, १६व्या दिवशीही जबरदस्त कमाई!

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवत आहे. विकी कौशलने साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. विकीचा भारदस्त अभियन, भव्यदिव्य सेट्स आणि दमदार कथा यामुळे प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. चित्रपटाने अवघ्या १६ दिवसांत ४३३.५० कोटींची कमाई करत घवघवीत यश मिळवले आहे.

 

छावाची क्रेझ केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर दिसून येत आहे. चित्रपटगृहांमध्ये अजूनही हाऊसफुल्ल बोर्ड झळकत आहेत. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. त्याचा देहबोली, संवादफेक आणि युद्धप्रसंगांतील अभिनय प्रेक्षकांच्या हृदयात ठसला आहे. रश्मिका मंदानाने येसुबाईंची भूमिका साकारताना आपल्या सहजसुंदर अभिनयाने छाप पाडली आहे. तर अक्षय खन्नाच्या औरंगजेब भूमिकेचीही सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

 

'छावा'ची ५०० कोटी क्लबकडे वाटचाल

प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'छावा'ची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी दमदार राहिली आहे. पहिल्याच दिवशी ३१ कोटींचा गल्ला जमवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तर तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटींची विक्रमी कमाई करत चित्रपटाने जोरदार ओपनिंग घेतली. पहिल्या आठवड्यातच २१९.२५ कोटींची कमाई झाल्याने ‘छावा’च्या यशाचा चढता आलेख स्पष्ट झाला. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने १८०.२५ कोटींचा व्यवसाय केला. १६व्या दिवशी २१ कोटींची भर घालून चित्रपटाची एकूण कमाई ४३३.५० कोटींच्या घरात पोहोचली आहे. सद्या असलेली चित्रपटाची क्रेझ कल पाहता लवकरच तो ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी शक्यता आहे.

हेही वाचा - Celebrities Use These Perfumes: शाहरूख खान, रणवीर सिंह वापरतात या ब्रँडचे परफ्यूम

 

मराठ्याच्या शौर्यावर आधारलेला 'छावा' 

'छावा' हा हिंदी चित्रपट असला तरी तो मराठ्यांच्या शौर्यावर आधारित आहे. त्यात अनेक मराठी कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका भाषेपुरता मर्यादित राहिला नाही. तर संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांनी तो स्वीकारला आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासाला भव्यदिव्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर आणल्याने ‘छावा’ हा चित्रपट मराठी अस्मितेचा एक महत्त्वाचा अध्याय ठरत आहे.

हेही वाचा - Kantara Film: कांतारा चित्रपटांत दाखवलेल्या पंजुर्ली देवता कोण आहेत?

छावाच्या नजरा विक्रमांवर

'छावा'ची कथा, अभिनय, संगीत आणि भव्य युद्धदृश्ये यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच 'छावा' ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं विश्लेषकांचं मत आहे. छावाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड पाहता हा चित्रपट आणखी किती विक्रम प्रस्थापित करतो याकडे सर्वाच्या नजरा आहेत.


सम्बन्धित सामग्री