Wednesday, August 20, 2025 03:52:46 PM

Chhaava Box Office Collection Day 40 : छावाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, पठाण, अॅनिमल आणि 'गदर २'लाही टाकलं मागे

Chhaava Box Office Collection Day 40 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच आहे.

chhaava box office collection day 40  छावाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड पठाण अॅनिमल आणि गदर २लाही टाकलं मागे
Chhaava Box Office Collection Day 40 : छावाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, पठाण, अॅनिमल आणि 'गदर २'लाही टाकलं मागे

बॉलीवूड अभिनेता विक्की कौशलचा छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शनला ४० दिवस उलटले तरी छावा अजूनही थिएटरमध्ये गर्दी खेचत आहे. आतापर्यंत या चित्रपटानं एकूण ५८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, छावाने ४० व्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ०.४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रात्रीच्या शोमध्ये हा आकडा १ ते १.५ कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. अद्याप अंतिम अधिकृत आकडे आले नसले तरी चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे.

हेही वाचा -  Stones Thrown At Sonu Nigam During A Concert: लाईव्ह शो दरम्यान सोनू निगमवर दगडफेक
 

छावाने या चित्रपटांना टाकलं मागे 
छावाने अनेक सुपरहिट चित्रपटांना मागे टाकले आहे. आतापर्यंत या चित्रपटानं शाहरुख खानचा पठाण (५४३.०९ कोटी), रणबीर कपूरचा अॅनिमल (५५३.८७ कोटी), सनी देओलचा गदर २ (५२५.७ कोटी) आणि आमिर खानचा पीके (३४०.८० कोटी) या चित्रपटांना मागं टाकलं आहे. 

स्त्री २ ला मागे टाकणार छावा
छावा सध्या स्त्री २ च्या एकूण कमाईपेक्षा १२ कोटी रुपयांनी मागे आहे. जर चित्रपटाने पुढील काही दिवसांत चांगली कमाई केली तर तो स्त्री २ लाही मागे टाकू शकतो.

हेही वाचा - Athiya Shetty KL Rahul Blessed With Baby Girl: सुनील शेट्टी आजोबा झाला! अथिया शेट्टीने दिला गोंडस मुलीला जन्म

छावाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी रूपये कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटींचा गल्ला केला. तर तिसऱ्या आठवड्यात छावाने  ८४.०५ कोटींची कमाई केली. चौथ्या आठवड्यात कमाईचा आकडा ५५.९५ कोटी होता. पाचव्या आठवड्यात छावाने ३३.३५ कोटी कमावले. 

छावा चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना शंभूराजेंची पत्नी येसुबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका निभावली आहे. ऐतिहासिक कथा, दमदार अभिनय आणि भव्य निर्मितीमुळं या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री