Deepika Padukone Louis Vuitton Prize 2025: दीपिका पादुकोण आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक मानली जाते. सलग ब्लॉकबस्टर चित्रपट, हजारो कोटींची कमाई आणि फॅशन तसेच लक्झरी जगतातील तिची दमदार उपस्थिती यामुळे ती केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बनली आहे. 2022 मध्ये लुई व्हिटॉन आणि कार्टियरसारख्या जागतिक फॅशन हाऊससोबत करार करून दीपिकाने इतिहास रचला आहे.
हेही वाचा - Famous Fashion Designer Giorgio Armani Died : प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानीने घेतला वयाच्या 91व्या वर्षी अखेरचा श्वास! कोण होणार 'अरमानी' ब्रँडच्या संपत्तीचा वारसदार? जाणून घ्या
आता दीपिकाने आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. 2025 च्या LVMH पुरस्कारासाठी ती लुई व्हिटॉनची राजदूत आणि ज्युरी सदस्य म्हणून निवडली गेली आहे. गेल्या वर्षी ती नताली पोर्टमनसोबत 2024 LVMH पुरस्काराच्या ज्युरीत सहभागी झाली होती. ब्रँडने घोषणा करताना लिहिले, 'आयकॉनिक दीपिका पदुकोण जगभरातील प्रेक्षकांना प्रेरणा देते. या वर्षीच्या LVMH पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी ज्युरीमध्ये सामील झाल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.'
हेही वाचा - The Bengal Files : 'द बंगाल फाइल्स' वादाच्या भोवऱ्यात, पल्लवी जोशींची राष्ट्रपतींना विनंती
चित्रपटसृष्टीतही दीपिकाचे व्यस्त वेळापत्रक आहे. ती दिग्दर्शक अॅटलीच्या AA22XA6 या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत काम करणार आहे. त्याशिवाय तिच्या ब्लॉकबस्टर ‘कल्की 2898 AD’ चा बहुप्रतिक्षित सिक्वेलही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. फॅशनपासून सिनेमापर्यंत, दीपिका पादुकोण भारताचे प्रतिनिधित्व करत जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.