Sunday, August 31, 2025 09:22:11 PM

तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार एस. कृष्णमूर्ती यांचे कर्करोगाने निधन

माधवन बॉब यांनी आपल्या कारकिर्दीत 700 हून अधिक चित्रपटांत सहाय्यक आणि विनोदी भूमिका साकारल्या. त्यांनी रजनीकांत, कमल हासन, अजित, सूर्या, विजय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार एस कृष्णमूर्ती यांचे कर्करोगाने निधन
Madhavan Bob passes away
Edited Image

Madhavan Bob Passes Away: तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि विनोदी कलाकार एस. कृष्णमूर्ती उर्फ 'माधवन बॉब' यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी लढा देत त्यांनी 2 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या अड्यार येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

संगीतकार ते अभिनेतापर्यंतचा प्रवास

19 ऑक्टोबर 1953 रोजी जन्मलेल्या माधवन बॉब यांनी संगीतकार म्हणून करिअरची सुरुवात केली आणि नंतर अभिनयात यशस्वी वाटचाल केली. 1984 मध्ये 'नींगल केट्टावई' या चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केले, तर 'वानमे एलाई' हा त्यांचा पहिला महत्त्वाचा चित्रपट ठरला.

हेही वाचा - National Film Awards: शाहरुख खानला पहिल्यांदाच नॅशनल अवॉर्ड! यंदाच्या नॅशनल अवॉर्ड्समध्ये कोण-कोण चमकलं? वाचा संपूर्ण यादी

700 पेक्षा अधिक चित्रपटात काम - 

माधवन बॉब यांनी आपल्या कारकिर्दीत 700 हून अधिक चित्रपटांत सहाय्यक आणि विनोदी भूमिका साकारल्या. 'थेनाली', 'पम्मल के', 'फ्रेंड्स', 'संबंधम', 'साथी लीलावती' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे अभिनय आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. त्यांनी रजनीकांत, कमल हासन, अजित, सूर्या, विजय यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

हेही वाचा - नेहमीपेक्षा हटके! 'बिग बॉस 19'चा धमाकेदार प्रोमो रिलीज

संगीत आणि टेलिव्हिजनमध्ये योगदान

माधवन बॉब यांनी विक्कू विनायकराम आणि हरिहर शर्मा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले होते. पाश्चात्य आणि कर्नाटक संगीत या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांना प्रावीण्य होते. ते सन टीव्हीवरील 'असथापोवथु यारू' या शोमध्ये न्यायाधीश म्हणूनही झळकले होते. अभिनेता व नृत्यदिग्दर्शक प्रभु देवा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटलं आहे की, 'त्यांची उपस्थिती सेटवर नेहमी आनंद निर्माण करत असे. माधवन बॉब अत्यंत नम्र आणि दिलदार व्यक्तिमत्त्व होते. त्यांची आठवण सदैव राहील.'
 


सम्बन्धित सामग्री