Wednesday, August 20, 2025 08:45:42 PM

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा बदललेला लूक पाहून चाहते झाले थक्क

उर्मिलाने तिचे सध्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप वेगळी दिसत आहे, ज्यामुळे चाहते उर्मिलाला ओळखण्यात अडचणीत पडले आहेत.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा बदललेला लूक पाहून चाहते झाले थक्क

मुंबई: 90 च्या दशकात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तसेच मनमोहक सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर जगभरात प्रसिद्ध आहे. एकेकाळी, उर्मिलाने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने रुपेरी पडद्यावर राज्य केले होते. मात्र, गेल्या काही काळापासून उर्मिला मोठ्या पडद्यापासून दूर होती. परंतु, ती आजही सोशल मीडियावर सक्रिय आहे.

उर्मिलाचा नवा लुक चर्चेत:

अलीकडेच, उर्मिलाने तिचे सध्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप वेगळी दिसत आहे, ज्यामुळे चाहते उर्मिलाला ओळखण्यात अडचणीत पडले आहेत. उर्मिला खूपच बारीक आणि तरुण दिसत आहे. ती 51 वर्षांची आहे असे कोणीही म्हणू शकत नाही.

 

उर्मिलाने शस्त्रक्रिया केली?

नेटिझन्सचा असा विश्वास आहे की उर्मिलाने फोटोंसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, किंवा वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक वापरला असेल, अथवा शस्त्रक्रिया केली असावी. उर्मिलाच्या पोस्टवर नेटिझन्स विविध कमेंट्स करत आहेत. एका नेटिझनने कमेंट केली, 'एकतर हे तिच्या चेहऱ्यावर केलेले 10 जीबी एआय वर्क आहे किंवा 10 किलो ओझेम्पिक आहे. आणखी एक नैसर्गिक सौंदर्य कृत्रिम शो ऑफचा बळी ठरले'.

हेही वाचा: महत्वाची बातमी; 1 जुलैपासून रेल्वे प्रवाशांसाठी लागू होणार नवे नियम

या चित्रपटांत उर्मिलाने काम केले:

'रंगीला', 'जुदाई', 'सत्या', 'छोटा चेतन', 'कौन', 'खूबसूरत', 'प्यार तूने क्या किया', 'भूत' आणि अनेक यशस्वी चित्रपटांत उर्मिलाने काम केले आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला तिचा शेवटचा हिंदी चित्रपट 'ईएमआय' होता. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ब्लॅकमेल' या गाण्याने तिने पुनरागमन केले. 2022 मध्ये ती 'डीआयडी सुपर मॉम्स' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली.


सम्बन्धित सामग्री