Thursday, August 21, 2025 12:10:18 AM

हृदयाचे ठोके वाढवणारा 'वेपन्स' चित्रपट कधी आणि कुठे पाहाल; जाणून घ्या

बार्बेरियन दिग्दर्शक जॅक क्रिएगर यांचा हॉरर चित्रपट सतत चर्चेत असतो. ज्युलिया गार्नर आणि जोश ब्रोलिन स्टारर 'वेपन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

हृदयाचे ठोके वाढवणारा वेपन्स चित्रपट कधी आणि कुठे पाहाल जाणून घ्या

मुंबई: बार्बेरियन दिग्दर्शक जॅक क्रिएगर यांचा हॉरर चित्रपट सतत चर्चेत असतो. नुकताच, ज्युलिया गार्नर आणि जोश ब्रोलिन स्टारर 'वेपन' हा चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टीझर काळ्या रात्रीच्या भयानक कथेची झलक दर्शावतो. त्यामुळे, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्साही आहेत. या चित्रपटाची तुलना द कॉन्ज्युरिंग आणि अ‍ॅनाबेले सारख्या हॉलीवुड चित्रपटांसोबत होत आहे. या चित्रपटाची कथा काय आहे? यासह, हा चित्रपट तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकतात? चला सविस्तर जाणून घेऊया.

या चित्रपटाचा टीझर 2:17 मिनिटांचा आहे, ज्यात मेब्रुकमध्ये राहणारी 17 मुले अचानक गायब होतात. मात्र, मुले गायब झाल्यानंतर, एक कॅमेरा फुटेज सापडतो, ज्यात हरवलेली मुले नशेत इकडे तिकडे धावताना दिसतात. जेव्हा काहीही चुकीचे आढळत नाही, तेव्हा सर्वांचा संशय शिक्षिका जस्टिन गॅंडी (ज्युलिया गार्नर) वर येतो. याचं कारण म्हणजे, सर्व मुले तिच्या वर्गात असतात. जेव्हा संपूर्ण शहर शिक्षिका जस्टिन गॅंडीच्या विरोधात जाते, तेव्हा ती आर्चर ग्राफ (जोश ब्रोलिन) सोबत हातमिळवणी करते, जो एक हताश वडील आहे. या दरम्यान, ते दोघे मुलांच्या बेपत्ता होण्यामागील कारण शोधू लागतात. तसेच, चित्रपटात पुढे काय होते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'वेपन्स' चित्रपट पाहावा लागेल. 

'वेपन्स' कधी आणि कुठे पाहू शकतात?

जरी हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नसला तरी, चित्रपट समीक्षकांकडून 'वेपन्स' या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या रहस्यमय हॉरर चित्रपटाला 94% रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटाला सर्वोत्तम हॉरर चित्रपट म्हटले जात आहे. हा चित्रपट तुम्ही 8 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये पाहू शकता. हा चित्रपट IMAX मध्ये 3D मध्ये देखील उपलब्ध आहे. या चित्रपटात ज्युलिया गार्नर आणि जोश ब्रोलिन व्यतिरिक्त, एल्डन एहरेनरीच, कॅरी क्रिस्टोफर, ऑस्टिन अब्राम्स, बेनेडिक्ट वोंग, एमी मॅडिगन सारखे कलाकार दिसतील.


सम्बन्धित सामग्री