मुंबई: चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्यांची इच्छा असते की, देशात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' एक दिवस आपल्यालाही मिळावा. शुक्रवारी, 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आली आहे. यंदा मराठी चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळाला. 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान 'श्यामची आई' या सिनेमाला मिळाला आहे. सुजय डहाके दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता ओम भुतकरने साने गुरुजींची भूमिका साकारली होती. यासह, संदीप पाठक, गौरी देशपांडे, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर या अभिनेत्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
हेही वाचा: 'महादेवी' हत्तीण नांंदणीत परतणार का? वनताराकडून हालचालींना वेग
यावेळी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारासाठी विक्रांत मेस्सीच्या नावाची घोषणा झाली होती. '12th फेल' चित्रपटासाठी विक्रांत मेस्सीला हा पुरस्कार प्रदान करणार आहे. यासह, शाहरुख खानलादेखील 'जवान' चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शाहरुखचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच, सुदीप्तो सेन यांना 'द केरला स्टोरी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
हेही वाचा: नांदेडमधील शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणा; रुग्णांच्या अंगावर फिरतात उंदीर
'ही' आहे विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमन
सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडू
सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म- भागावान्थ केसरी
सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पार्किंग
सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म- गॉडडे गॉडडे चा
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- शामची आई
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कठल
सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा- वश
सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा- डीप फ्रीजर
सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा- हनूमान
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)
सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- अॅनिमल
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव
सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार- कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकले आणि भार्गव
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- उर्वशी, जानकी बोडीवाला
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल
सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा- नाळ 2
सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक- आशीष बेंडे (आत्मपॅम्फलेट)
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म- 12th फेल