Monday, September 01, 2025 12:05:59 AM

Priya Marathe Passed Away: ...आणि प्रियाची कर्करोगाशी झुंज अपयशी, कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन झाले आहे. 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. प्रियाच्या निधनावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

priya marathe passed away आणि प्रियाची कर्करोगाशी झुंज अपयशी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

 

Priya Marathe Passed Away: प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन झाले आहे. 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. आज संध्याकाळ चार वाजता तिच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत. प्रिया मराठे यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्व माध्यमांवर आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचली. तिच्या अष्टपैलू अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आतापर्यंत तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. हिंदी आणि मराठी दोन्ही मालिकांमध्ये तिने काम केले आहे. 

प्रियाच्या मृत्यूने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रियाच्या निधनावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला खूप वाईट वाटलं. अंकिता आणि मी तिला भेटायला जाणार होते. देवं अस का करतो कळतं नाही, असे व्हायला नको होतं. बिचाऱ्या पोरीने आता आता संसार उभा केला होता आणि असं झाले. देव तिच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी दिली आहे. यावेळी प्रियाबद्दल बोलताना त्या भावूक झाल्या. 

हेही वाचा: Actress Priya Marathe Passed Away : अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन

38 व्या सिनेसृष्टीत आकार घेत असताना मनाला चटका लावणारी घटना घडली. गणेशोत्सवात प्रिया मराठेचं जाणं अत्यंत चटका लावणार, धक्कादायक आणि क्लेशकारक आहे. आजच्या दिवसाची सुरुवात या बातमीने होणं अत्यंत त्रासदायक असल्याचे चित्रपट समिक्षक दिलीप ठाकूर यांनी म्हटले आहे. आकस्मित निधनाने धक्का बसला. आम्ही एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं. ती हसतं, खेळतं जिवंत व्यकिमत्तव होतं. तिच्या आजाराबद्दल फार कोणाला माहिती नव्हतं. ती एकटी आजाराशी लढत होती. ती स्ट्रॉग वूमन होती आणि देव तिच्या आत्म्यास शांती लाभो देवो अशी प्रतिक्रिया किशोरी शहाणे यांनी दिल्या आहेत. तसेच उत्तम अभिनेत्री आणि उत्तम माणूस असलेली प्रिया मराठे वयाच्या 38 वर्षी कॅन्सरशी झगडताना आज सकाळी आपल्याला सोडून गेली... फारच दु:खद आहे हे अशा आशयाची पोस्ट करत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी प्रियाच्या निधनावर केली आहे. 


सम्बन्धित सामग्री