मुंबई: गेल्या तीन दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता रजनीकांत आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांचा 'कुली' चित्रपटाचा बहुचर्चीत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच काळापासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. लोकेश कनागराज यांनी त्यांचा चित्रपट प्रत्येक अर्थाने खास बनवला आहे. या चित्रपटात दक्षिणेतील कलाकार देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. 'कुली' चित्रपटाचा बहुचर्चीत ट्रेलर प्रदर्शित झाल्याने, या चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा: कोल्हापुरात सर्किट बेंचला मान्यता; 18 ऑगस्टपासून कामकाजाचं श्रीगणेशा
'कुली'च्या नवीन ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांशी आणि त्याच्या कथेशी संबंधित काही संकेत दिले आहेत. यासह, या चित्रपटाची कथा सोन्याच्या तस्कराभोवती बांधली गेली आहे, ज्यात कलाकारांचा भरपूर अॅक्शन आणि स्वॅग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नेहमीप्रमाणे, या चित्रपटातूनही सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाने प्रेक्षकांना स्तब्ध केले. तसेच, नागार्जुनने देखील व्हिलनची भूमिका साकारून चाहत्यांना घायाळ केले. अशातच, एका दमदार अभिनयाची एंट्री होते, ज्याने काही क्षणातच प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली. तो अभिनेता म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान. यापूर्वी, अनेक उत्तम चित्रपट बनवणारे दिग्दर्शक लोकेश कनागराज आता सुपरस्टार रजनीकांत आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला मोठ्या पडद्यावर कशाप्रकारे दाखवतील हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
हेही वाचा: Jalna Jodimaro Andolan : पृथ्वीराज चव्हाणांच्या निषेधार्थ युवासेनेचे जोडेमारो आंदोलन
या चित्रपटात, सुपरस्टार रजनीकांत आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्यासह नागार्जुन अक्किनेनी, श्रुती हासन, उपेंद्र राव, सत्यराज सारखे अभिनेते मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा एका सोन्याच्या तस्कराभोवती बांधली गेली आहे, ज्यात अभिनेत्यांचा अॅक्शन आणि स्वॅग पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासह, हृतिक-ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर 2' चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे, या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट गाजणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.