मुंबई: बॉलीवुडचा खलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय दत्तने मंगळवारी 66वा वाढदिवस साजरा केला. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तमाम रसिक प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्याने दिवंगत अभिनेते नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा वारसा पुढे नेला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की संजय दत्तला एक मोठी मुलगी आहे, जी प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. विशेष बाब म्हणजे, ती संजय दत्तच्या तिसऱ्या बायकोपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. ती काय करते, कुठे राहते आणि कशी दिसते याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: Sangli: शरद पवार गटाला मोठा धक्का; जयंत पाटलांच्या शिलेदाराचा भाजपात प्रवेश
'ही' आहे संजय दत्तची मोठी मुलगी
संजय दत्तने तीन वेळा लग्न केले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे रिचा शर्मा. जिच्यापासून त्याला त्रिशला दत्त ही मुलगी आहे. यानंतर, त्याने रिया पिल्लईशी दुसरे लग्न केले, जे फार काळ टिकले नाही. सध्या, संजय दत्त त्याच्या तिसऱ्या पत्नीसोबत कौटुंबिक जीवन जगत आहे. या दोघांना जुळी मुले आहेत. विशेष बाब म्हणजे, संजय दत्तची मुलगी त्रिशला दत्त ही त्याच्या तिसऱ्या पत्नीपासून फक्त 10 वर्षांनी लहान आहे.
हेही वाचा: फक्त तिकीटचं नाही, तर 'या' मार्गातून चित्रपटगृह कमावतात लाखो रुपये
त्रिशला किती शिकली आहे?
त्रिशला दत्त ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी आहे. 1987 मध्ये संजय आणि रिचा यांचे लग्न झाले होते आणि 1988 मध्ये त्रिशलाचा जन्म झाला. मात्र, दुर्दैवाने त्रिशलाचे आयुष्य खूप दुःखाने सुरू झाले. त्रिशला जेव्हा फक्त ८ वर्षांची होती, तेव्हा तिच्या आईचा रिचा ब्रेन ट्यूमरमुळे निधन झाले. त्यानंतर, त्रिशलाला तिच्या आजी-आजोबांसोबत अमेरिकेत राहू लागली. त्रिशलाचे संगोपन तिथेच झाले आणि त्रिशलाने तिचे शिक्षणही तिथेच पूर्ण केले. तिच्याकडे कायद्याची पदवी आहे, जी तिने न्यू यॉर्कमधून पूर्ण केली. तिचे क्रिमिनल जस्टिसमध्ये स्पेशलायझेशन आहे.
त्रिशाने कधीही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नाही. तिला अनेक चित्रपटांची ऑफर मिळाली होती. मात्र, तिने सर्व चित्रपट नाकारले आणि बॉलिवूडपासून लांब राहणे पसंत केले. सध्या, ती अमेरिकेत राहते आणि एक व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करते. सोशल मीडियावर अनेकदा ती मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी शेअर करते.