Wednesday, August 20, 2025 11:31:04 AM

Michelle Trachtenberg Dies: 'गॉसिप गर्ल' मिशेल ट्रॅचटेनबर्गचे निधन; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्री तिच्या मॅनहॅटन अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.

michelle trachtenberg dies गॉसिप गर्ल मिशेल ट्रॅचटेनबर्गचे निधन 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Michelle Trachtenberg Dies
Edited Image

Michelle Trachtenberg Dies: हॉलिवूडमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमेरिकन अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचे निधन झाले आहे. मिशेलच्या मृत्यूमुळे अमेरिकन चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. 'गॉसिप गर्ल' सारख्या विविध मालिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. अमेरिकन मीडिया आउटलेट्सनी वृत्त दिले की अमेरिकन अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्ग यांचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, बुधवारी अभिनेत्री तिच्या मॅनहॅटन अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. यापूर्वी काही माध्यमांनी मिशेलवर यकृत प्रत्यारोपण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. 

हेही वाचा - Chhava Film Shooting Location: छावा चित्रपटाचे शूटिंग कुठे झाले तुम्हाला माहित आहे?

कोण आहे मिशेल ट्रॅचटेनबर्ग?

अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. मिशेलला लहानपणापासूनच अभिनयाच्या जगात रस होता. मिशेलला अभिनयाच्या जगात स्वतःचे नाव कमवायचे होते. तिने 1991 मध्ये न्यू यॉर्कमध्ये 'लॉ अँड ऑर्डर' या मालिकेच्या एका भागातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मिशेल 1996 मध्ये 'हॅरियर द स्पाय' चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसली.

हेही वाचा - जॉन अब्राहमच्या 'The Diplomat' ची नवी रिलीज डेट जाहीर, आता 'या' दिवशी येणार सिनेमागृहात

'गॉसिप गर्ल' या शोमध्ये मुख्य भूमिका - 

मिशेलच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वळण 2000 मध्ये आले, जेव्हा तिला 'बर्फी द व्हॅम्पायर स्लेअर' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये तिने मुख्य पात्र मिशेल गेलरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यामुळे अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर मिशेलने 2008 मध्ये 'गॉसिप गर्ल' या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली. मिशेलने 'युरोट्रिप', '17 अगेन' आणि 'द स्क्रिबलर' सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. 
 


सम्बन्धित सामग्री