Monday, September 01, 2025 06:49:00 AM

अ‍ॅक्शन सीन शूट करताना Guru Randhawa गंभीर जखमी; रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

गुरु त्यांच्या आगामी 'शौंकी सरदार' चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याने त्याच्या सोशल मीडियावर रुग्णालयातीस एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे.

अ‍ॅक्शन सीन शूट करताना guru randhawa गंभीर जखमी रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
Guru Randhawa Hospitalized
Instagram

Guru Randhawa Hospitalized: पंजाबी गायक-अभिनेता गुरु रंधावा स्टंट करताना जखमी झाला आहे. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरु त्यांच्या आगामी 'शौंकी सरदार' चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याने त्याच्या सोशल मीडियावर रुग्णालयातीस एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रंधावाने म्हटलं आहे, 'माझा पहिला स्टंट, माझी पहिली दुखापत, पण माझे धाडस अबाधित आहे. शौंकी सरदार चित्रपटाच्या सेटवरील एक आठवण. अ‍ॅक्शन हे खूप कठीण काम आहे, पण मी माझ्या प्रेक्षकांसाठी कठोर परिश्रम करेन.' 

हेही वाचा - विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने 8व्या दिवशी ओलांडला 242 कोटींचा गल्ला; पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक!

गुरु रंधावाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या फोटोमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर पडून असल्याचे दिसत आहे. त्याने सर्व्हायकल कॉलर घातला आहे. त्याच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणाही दिसत आहेत. गुरुच्या अपघाताची बातमी कळताच त्याचे चाहते चिंतेत पडले असून त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

याशिवाय काही चित्रपट कलाकारांनी देखील गुरुच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना केली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी लिहिले, 'तू सर्वोत्तम आहेस. लवकर बरे व्हा.' मृणाल ठाकूरने लिहिले, 'व्हाट? या कमेंटसोबत अभिनेत्रीने एक धक्कादायक इमोजीही पोस्ट केली आहे. याशिवाय, मिका सिंगनेही गुरु यांना लवकर बरे व्हावे, यासाठी शुभेच्छा दिल्या  आहेत. 

हेही वाचा - India’s Got Latent प्रकरणात राखी सावंतची चौकशी होणार; महाराष्ट्र सायबर सेलकडून बजावण्यात आले समन्स

'शौंकी सरदार' पुढील वर्षी प्रदर्शित होणार - 

दरम्यान, 'शौनकी सरदार' हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यात गुरु रंधावासोबत निमरत अहलुवालियाची भूमिका आहे. हा चित्रपट प्रेम, निष्ठा आणि संस्कृतीची हृदयस्पर्शी कहाणी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज रतन करत आहेत.


सम्बन्धित सामग्री