Wednesday, August 20, 2025 04:32:31 AM

John Abraham : 'छावा' सारख्या चित्रपटात कधीच काम करणार नाही'; जॉन अब्राहमचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला, 'मला अशा चित्रपटांची...'

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमनं 'दि काश्मिर फाईल्स' आणि 'छावा' चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

john abraham   छावा सारख्या चित्रपटात कधीच काम करणार नाही जॉन अब्राहमचं वादग्रस्त वक्तव्य म्हणाला मला अशा चित्रपटांची

मुंबई : बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम थेट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत राहतो. जॉन अब्राहमनं आजवर अनेकर देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केले आहे. येत्या काळातही काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान, जॉननं 'दि काश्मिर फाईल्स' आणि 'छावा' चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जॉन म्हणाला की, "अशा चित्रपटांची त्याला भीती वाटते आणि भविष्यात तो अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये कधीच काम करणार नाही." त्याच्या या वक्तव्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा : Salman Khan: सलमान खानला आयपीएल टीमची ऑफर, म्हणाला 'मला एक टीम खरेदी करण्याची...

जॉन अब्राहम लवकरच त्याच्या 'तेहरान' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2012 मध्ये इस्रायली राजदूतांवर झालेल्या हल्ल्यावर आधारित आहे. जॉन अब्राहमने नुकतंच एका मुलाखतीत आपलं मत स्पष्ट केलं. यावेळी जॉन म्हणाला की, "मी 'छावा' पाहिला नाही, पण मला माहीत आहे की लोकांना तो आवडला. 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला आहे. पण मला अशा चित्रपटांची भीती वाटते. जेव्हा चित्रपट राजकीय हेतू मनात ठेवून लोकांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने बनवले जातात आणि अशा चित्रपटांना प्रचंड यश मिळतं, तेव्हा मला चिंता वाटते. मला अशा सिनेमांचा कधीच मोह झाला नाही आणि मी अशा प्रकारचे चित्रपट कधीच करणार नाही."

दरम्यान, 2022 मध्ये प्रदर्शित झालेला दि काश्मीर फाईल्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या सिनेमाने देशात 252 कोटींचा गल्ला जमवला, तर जगभरातील कमाई 341 कोटी एवढी आहे. तर, छावा सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 


सम्बन्धित सामग्री