Wednesday, August 20, 2025 09:16:19 AM

अनंत-राधिकाच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त किंगखानने दिल्या खास शुभेच्छा

नेक बॉलीवूड अभिनेत्यांनी अनंत आणि राधिकाला त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, शाहरुख खान आणि सलमान खान यांनीही खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

अनंत-राधिकाच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त किंगखानने दिल्या खास शुभेच्छा

मुंबई: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 ते 14 जुलै 2024 दरम्यान मुंबईत पार पडला. यात विवाहसोहळ्यात देशभरासह जगभरातील अनेक नामवंत व्यक्तिमत्त्व उपस्थित होते. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला आता एक वर्ष झाले आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्यांनी अनंत आणि राधिकाला त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, शाहरुख खान आणि सलमान खान यांनीही खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

हेही वाचा: जे आडवं येईल त्याला उचला, त्याशिवाय हे होणार नाही; अजितदादांचा स्पष्ट निर्देश

अनंत-राधिकासाठी किंगखानने दिल्या खास शुभेच्छा

शाहरुख खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये राधिका आणि अनंत एकमेकांसोबत पोज देताना दिसत आहेत. यासोबत शाहरुखने लिहिले की, 'या सुंदर जोडप्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणखी अनेक वर्षे एकत्र राहा. तुम्हाला नेहमीच प्रेम आणि आरोग्यासाठी शुभेच्छा. राधिका आणि अनंत दोघांनाही खूप खूप प्रेम'. 

सलमान खानने दिले अनंत-राधिकाला 'प्रेमळ' मेसेज

बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खाननेही राधिका आणि अनंतचे अभिनंदन केले. यासोबतच, त्याने एक गोंडस फोटो शेअर केला, ज्यामध्ये हे जोडपे काळ्या पोशाखात एकत्र पोज देत आहे. या फोटोसोबत, अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अनंत आणि राधिकाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आनंदी राहा, देव तुम्हाला आशीर्वाद देवो, प्रेम करो'. 


 


सम्बन्धित सामग्री