मुंबई: लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘जेठालाल’ म्हणजेच अभिनेता दिलीप जोशी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते त्यांच्या अभिनयासाठी नव्हे, तर त्यांच्या फिटनेससाठी चर्चेत आले आहेत. बऱ्याच काळापासून मालिकेत दिसत नसलेले जेठालाल लवकरच परत येणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.
दिलीप जोशींचं फिटनेस सीक्रेट -
दिलीप जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी फक्त 45 दिवसांत तब्बल 16 किलो वजन कमी केलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांचे वजन जिमशिवाय किंवा कठोर डायटशिवाय कमी केलं आहे. त्यांची ही साधी पण प्रभावी दिनचर्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.
दिलीप जोशीने कसं कमी केलं वजन?
आपल्या वजन घटवण्याच्या प्रवासाबद्दल सांगताना दिलीप जोशी म्हणाले, 'मी दररोज कामावर जायचो, स्विमिंग क्लबमध्ये कपडे बदलायचो आणि मग मरीन ड्राइव्ह ओलांडून ओबेरॉय हॉटेलपर्यंत जॉगिंग करायचो. पुन्हा तिथून परत यायचो. या संपूर्ण प्रवासासाठी सुमारे 45 मिनिटे लागायची आणि हाच सराव मी 45 दिवस सतत केला.'
हेही वाचा - सलमान खानने वांद्रे येथील अपार्टमेंट विकले; किती रुपयांमध्ये झाला व्यवहार? जाणून घ्या
दिलीप जोशी पुन्हा शोमध्ये दिसणार -
दिलीप जोशींच्या या परिवर्तनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शोमधून त्यांनी ब्रेक का घेतला होता? याबाबत बरेच अंदाज लावले जात होते. पण आता निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे की दिलीप जोशी लवकरच 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये पुनरागमन करणार आहेत.
हेही वाचा - कियारा आणि सिद्धार्थच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन; चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण
सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
दिलीप जोशी यांच्या वजन कमी करण्याच्या यशावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कमेंट करत लिहिलंय, 'जेठालाल आता खरोखर ‘फिट’ झालेत!' तथापी, दिलीप जोशी यांनी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये आपल्या उत्तम अभिनयाने खूप नाव कमावले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ने शो मधून दिलीप जोशी घराघरात पोहोचले आहेत.