Wednesday, August 20, 2025 08:32:20 PM

पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अलीचा मृत्यू; 2 आठवडे घरात कुजत राहिला मृतदेह

हुमैरा हिने तमाशा घर या रिअॅलिटी टीव्ही मालिकेत आणि पाकिस्तानी चित्रपट जलेबीमध्येही काम केले होते. ती 32 वर्षांची होती. तिचा मृत्यू 2 आठवड्यांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अलीचा मृत्यू 2 आठवडे घरात कुजत राहिला मृतदेह
Humaira Asghar Ali Death

Humaira Asghar Ali Death: पाकिस्तानमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल हुमैरा असगर अली तिच्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली आहे. हुमैरा हिने तमाशा घर या रिअॅलिटी टीव्ही मालिकेत आणि पाकिस्तानी चित्रपट जलेबीमध्येही काम केले होते. ती 32 वर्षांची होती. तिचा मृत्यू 2 आठवड्यांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, मंगळवारी, तिच्या मृत्यूच्या जवळजवळ दोन आठवड्यांनंतर, कराचीतील डिफेन्स एरियामधील तिच्या अपार्टमेंटमध्ये अभिनेत्री मृतावस्थेत आढळली. हुमैरा असगर अली गेल्या काही वर्षांपासून तिच्या अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती.

डॉनमधील एका वृत्तात म्हटले आहे की, ती इत्तेहाद कमर्शियल नावाच्या ठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. स्थानिक न्यायालयाने तिला तिचा अपार्टमेंट रिकामा करण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिस तिच्या घरी आले होते. कारण तिच्या घरमालकाने आरोप केला होता की तिने 2024 पासून भाडे दिले नाही. पोलिस दुपारी 3:15 वाजता हुमैरा यांच्या कराचीच्या डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमधील अपार्टमेंटमध्ये पोहोचले. जेव्हा कोणीही दरवाजा उघडला नाही तेव्हा पोलिसांनी कुलूप तोडले. यावेळी पोलिसांना अभिनेत्रीचा मृतदेह आढळला. 

हेही वाचा - सी लिंकवर स्टंट करणे पडले महागात! गायक यासर देसाईविरुद्ध गुन्हा दाखल

हुमैरा असगर अलीच्या मृत्युचे कारण पोस्टमॉर्टेमनंतर समजू शकेल. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह जिना पोस्टग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. परिसरातील पोलिस प्रमुख सय्यद असद रझा यांच्या मते, अभिनेत्रीचा मृत्यू होऊन दोन आठवड्याहून अधिक काळ उलटला असावा. कारण, तिचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे.  

हेही वाचा - टीव्ही स्टार जय भानुशाली आणि माही विज घेणार घटस्फोट? जाणून घ्या

दरम्यान, पोलिस सर्जन डॉ. सुमैया सय्यद यांनीही डॉनला सांगितले की, हुमैरा यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, कारण तिचा मृतदेश कुजण्याच्या प्रगत अवस्थेत होती. पोलिसांच्या मते, कोणत्याही प्रकारचा घातपात झाल्याचे तात्काळ कोणतेही संकेत नाहीत. कारण, अपार्टमेंटचे लोखंडी गेट, लाकडी दरवाजा आणि बाल्कनी आतून बंद होती.
 


सम्बन्धित सामग्री