Prajakta Gaikwad To Get Married Soon: लहान पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिने 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून सर्वांवर छाप सोडली आहे. तिने इन्स्टाग्रामद्वारे तिच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणाची बातमी चाहत्यासोबत शेअर केली आहे. प्राजक्तानं सोशल मीडियावर फोटो शेअर करताना "प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा…", असं कॅप्शन दिलंय.
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारल्यापासून प्राजक्ता घराघरात पोहोचली. तिला छत्रपती शिवरायांच्या सुनबाईंची ओळख मिळाली. विक्की कौशलचा 'छावा' सिनेमा रिलीज झाला, त्यावेळी त्यातल्या येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या रश्मिकाला पाहून सर्वांना प्राजक्ताचीच आठवण झाली. तर, सर्वांच्या मनात स्थान मिळवलेली प्राजक्ता लवकरच लग्नाच्या मांडवात उभी राहणार आहे. ही आनंदाची बातमी देताना तिने सोबतच #ठरलं... असा हॅशटॅगही दिला आहे.
हेही वाचा - 170 तास भरतनाट्यम सादरीकरण! मंगळुरूच्या युवतीची 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद
काही दिवसांपूर्वी प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये ती पाहुण्यामंडळींच्या गराड्यात बसलेली दिसली. तसेच, प्राजक्तानं पारंपरिक पोशाख परिधान केला होता. हे पाहून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली होतीच. तिच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षावही सुरू झाला. पण आतापर्यंत प्राजक्तानं याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. आता मात्र, तिनं तिच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत. यामुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे.
या फोटोंमध्ये प्राजक्ता पारंपरिक वेशात खूप सुंदर दिसत आहे. तिच्या कपाळावर हळदीकुंकू लावलेलं आहे आणि गळ्यात हार घातलेला आहे. तिने एकूण चार फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये प्राजक्ता हात जोडून उभी आहे. प्राजक्ताच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मात्र, तिचा होणारा सात जन्मांचा भागीदार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राजक्तानं जोडीदार म्हणून कुणाची निवड केली आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते अधीर झाले आहेत.
हेही वाचा - अक्षय कुमारची प्रॉपर्टी डील! बोरीवलीत 2 फ्लॅट्स 'इतक्या' कोटींना विकले