मुंबई: काही ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्सविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी या प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवेराकोंडा, राणा दग्गुबाती आणि यांसारख्या अभिनेत्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, आणखी काही सेलिब्रिटींची चौकशी करण्यात अली असून त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्म्सवर बेकायदेशीर सट्टेबाजी आणि जुगाराद्वारे कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर पैसे कमावल्याचा आरोप आहे.
संघीय तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल करण्यासाठी पाच राज्य पोलिसांच्या एफआयआरची दखल घेतली आहे. अहवालानुसार, देवेराकोंडा, दग्गुबती, मंचू लक्ष्मी, राज, निधी अग्रवाल, प्रणिता सुभाष, अनन्या नागल्ला, टीव्ही होस्ट श्रीमुखी यांच्यासह स्थानिक सोशल मीडिया प्रभावक आणि युट्यूबर्ससह सुमारे 29 सेलिब्रिटींविरुद्ध ईडीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'आम्ही हार मानणार नाही...'; कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया
या सेलिब्रिटींवर जंगली रम्मी, जीटविन, लोटस 365 सारख्या ऑनलाइन बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याचा संशय आहे, ज्याच्या बदल्यात त्यांना सेलिब्रिटी किंवा जाहिरात शुल्क मिळते. अहवालानुसार, ईडी येत्या काही दिवसांत त्यांचे जबाब नोंदवू शकते. संबंधित अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तक्रारदाराने आरोप केला आहे की अनेक मोठे चित्रपट चेहरे आणि सोशल मीडिया स्टार लोकांना या बेटिंग अॅप्सकडे ओढत आहेत. अशा अॅप्समुळे मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांचे मोठे नुकसान होत आहे. या तक्रारीनंतर, सायबराबाद पोलिसांनी 25 सेलिब्रिटींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
हेही वाचा - पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अलीचा मृत्यू; 2 आठवडे घरात कुजत राहिला मृतदेह
ईडी आता या सर्व स्टार्स आणि प्रभावशाली व्यक्तींची चौकशी करत असून त्यांनी प्रमोशनवर किती पैसे खर्च केले आणि त्यांना पैसे कसे मिळाले? कर तपशील काय आहेत? याचा तपास करत आहे. तथापी, तपासात असे दिसून आले आहे की या अॅप्सद्वारे हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हे अॅप्स तरुणांना जलद पैसे कमविण्याचे आणि त्यांना सट्टा लावण्याचे आमिष दाखवतात. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.