Monday, September 01, 2025 06:36:04 AM

रिंकू राजगुरू होणार कोल्हापूरची सून?, कृष्णराज महाडिकांसोबतचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

कृष्णराज महाडिक आणि सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कृष्णराज आणि रिंकूचा हा फोटो पाहून अनेक चाहत्यांनी उत्साहात त्यांचे अभिनंदन करायला सुरुवात केलीये.

रिंकू राजगुरू होणार कोल्हापूरची सून कृष्णराज महाडिकांसोबतचा फोटो व्हायरल चर्चांना उधाण
रिंकू राजगुरू होणार कोल्हापूरची सून?, कृष्णराज महाडिकांसोबतचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक आणि सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कृष्णराज आणि रिंकूचा हा फोटो पाहून अनेक चाहत्यांनी उत्साहात त्यांचे अभिनंदन करायला सुरुवात केलीये. काहींनी तर त्या फोटोवर, लग्न ठरलंय का? अशा कमेंट्स केल्या आहेत. 

कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर रिंकूसोबतचा फोटो शेअर केलं असून या फोटोला त्यांनी आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. असे कॅप्शन दिले आहे. कृष्णराज यांनी हा फोटो शेअर होताच चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडू लागला आहे.

हेही वाचा - इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरोधात तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सोमवारी कोल्हापुरात पार पडलेल्या राजर्षी शाहू महोत्सवाला हजेरी लावली होती. महोत्सव संपल्यानंतर तिनं करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्याचवेळी कृष्णराज महाडिक देखील मंदिरात दर्शनासाठी आले होते. योगायोगाने त्यांची भेट झाली आणि त्यांनी एकत्र फोटो काढला. कृष्णराज यांनी तो सोशल मीडियावर शेअर करताच चर्चांना उधाण आलं. रिंकू राजगुरू नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरांत पोहोचली आहे. तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. तिनं कृष्णराज यांच्यासोबत फोटो काढल्यानं चर्चांना ऊत आला.

हेही वाचा -  सेलेना गोमेजला डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणांवर कोसळलं रडू
  
कृष्णराज महाडिक कोण आहेत? 
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे कृष्णराज हे चिरंजीव आहे. तसेच ते प्रसिद्ध यूट्यूबर आहेत. कृष्णराज महाडिक आपल्या समाजकारणामुळं प्रकाशझोतात आले. क्रिश महाडिक म्हणून युट्यूबवर ते अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. यात ते कधी गावचा रस्ता दुरुस्त करतात, तर कधी चक्क गावात घरोघरी जाऊन कचरा गोळा करताना कृष्णराज हे दिसून आले.  युट्यूबवरील त्यांच्या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळते. आता रिंकूसोबत त्यांनी काढलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


सम्बन्धित सामग्री