Sunday, August 31, 2025 04:42:43 PM

शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला कायदेशीर वादात अडकला; काय आहे नेमक प्रकरण? जाणून घ्या

शाहरुख आणि त्याचे कुटुंब बंगल्याच्या मोठ्या नूतनीकरणाची आणि विस्ताराची योजना आखत आहेत, ज्यामध्ये 616.02 चौरस मीटरचे अतिरिक्त बांधकाम समाविष्ट आहे. परंतु...

शाहरुख खानचा मन्नत बंगला कायदेशीर वादात अडकला काय आहे नेमक प्रकरण जाणून घ्या
Shah Rukh Khan Mannat bungalow
Edited Image

Shah Rukh Khan Mannat Bungalow: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' हा केवळ त्याचं घर नसून तो मुंबईचा एक प्रतिष्ठित लँडमार्क आहे. अनेक लोक हा बंगला पाहण्यासाठी मुंबईला येतात. परंतु, आता हा बंगला कायदेशीर वादात अडकला आहे. शाहरुख आणि त्याचे कुटुंब बंगल्याच्या मोठ्या नूतनीकरणाची आणि विस्ताराची योजना आखत आहेत, ज्यामध्ये 616.02 चौरस मीटरचे अतिरिक्त बांधकाम समाविष्ट आहे. परंतु, सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या प्रकल्पाबाबत गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) या प्रकरणाची दखल घेतली आहे.

काय आहे नेमक प्रकरण? 

शाहरुख खानने 2001 मध्ये हा बंगला 13.01 कोटी रुपयांना खरेदी केला होता, ज्याची किंमत आज सुमारे 200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. पण त्याआधी, हा बंगला 1800 च्या दशकात राजा विजय सेन यांनी त्यांच्या राणीसाठी बांधला होता. नंतर ते अनेक वेगवेगळ्या मालकांनी विकत घेतला आणि अखेर तो शाहरुख खानचे स्वप्नातील ठिकाण बनले.

हेही  वाचा - AR Rahman Hospitalized: ए आर रहमानची प्रकृती बिघडली; चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू

मन्नत वादाच्या भोवऱ्यात - 

आता हा बंगला वादात सापडला आहे, कारण शाहरुख खानने त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप केले जात आहेत. कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी म्हटलं आहे की, या प्रकल्पाला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून योग्य मान्यता मिळालेली नाही.

मन्नत संदर्भात शाहरुख खानवर कोणते आरोप ?

मन्नत संदर्भात शाहरुख खानवर परवानगीशिवाय दोन वारसा वास्तू पाडण्यात आल्याचा तसेच 6 मीटर खाली तळघर बांधून बेकायदेशीरपणे भूजल काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, तळमजला + 6 मजली इमारत सरकारी परवानगीशिवाय बांधण्यात आली. तसेच 12 एक-बीएचके फ्लॅट्सचे आलिशान व्हिलात रूपांतर करण्यात आले, जे शहरी जमीन मर्यादा आणि नियमन कायदा, 1976 चे उल्लंघन आहे.

हेही वाचा - Gold Smuggling Case: 'मला कोठडीत मारहाण करण्यात आली, उपाशी ठेवण्यात आलं...', राण्या रावचा DRI वर गंभीर आरोप

एनजीटीचा निर्णय काय असेल?

दरम्यान, आता एनजीटीने कार्यकर्त्याला ठोस पुरावे सादर करण्यासाठी 23 एप्रिलपर्यंतचा वेळ दिला आहे. जर पुरेसे पुरावे मिळाले नाहीत तर शाहरुख खानच्या नूतनीकरणाचे काम सुरूच राहील. मन्नत हे फक्त एक घर नाही तर शाहरुख खानच्या मेहनतीचे आणि यशाचे प्रतीक आहे. आता प्रश्न असा आहे की, तो ही कायदेशीर लढाई जिंकू शकेल का की एनजीटी त्याच्या स्वप्नांचा विस्तार थांबवेल? येत्या काही दिवसांत या सर्व प्रश्नांची उत्तर शाहरुखच्या चाहत्यांना मिळणार आहेत. 


सम्बन्धित सामग्री