Big Boss 19 Promo Release
Edited Image
मुंबई: सलमान खानचा बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा पहिला प्रोमो नुकताच जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीच्या सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. यात सलमान खान नेत्याच्या लूकमध्ये दिसत आहे. या वेगळ्या अंदाजामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
24 ऑगस्टपासून सुरू होणार शो
प्रोमोमध्ये सलमान म्हणतो, 'मित्रांनो आणि शत्रूंनो, तयार व्हा... यावेळी घरातील सदस्यांचे सरकार येणार आहे.' यावेळी बिग बॉस शो एक नव्या अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. प्रेक्षकांना 24 ऑगस्टपासून जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीवर हा शो पाहता येणार आहे.
हेही वाचा - हे खाऊन बघा, पटकन पटकन...; जेव्हा काश्मिरी मुस्लीम तरुण मराठी बोलतो...
बिग बॉसमध्ये नेत्याच्या भूमिकेत दिसला सलमान खान -
या शोच्या पहिल्या प्रोमो व्हिडिओमध्ये सलमान खान एका नेत्याच्या भूमिकेत दिसत आहे. या वेळी सलमानने नेत्याचा पोशाख परिधान केला असून, प्रोमोमध्ये तो एका निवडणुकीसारख्या वातावरणात घर चालवण्याचा आदेश देताना दिसतो. त्याच्या ‘राजकीय’ अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
हेही वाचा - 170 तास भरतनाट्यम सादरीकरण! मंगळुरूच्या युवतीची 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद
स्पर्धकांची नावं अद्याप गुलदस्त्यात
सध्या बिग बॉसच्या स्पर्धकांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. या सीझनमध्ये कोणते चेहरे दिसतील याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. गेल्या सीझनमध्ये करणवीर आणि चुम दरांग यांच्या प्रेमकथेची खूप चर्चा झाली होती. तसेच अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग यांची जोडीही चर्चेत होती. आता 'बिग बॉस 19' मध्ये कोणती नवी प्रेमकथा घडेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.