Thursday, August 21, 2025 05:39:14 AM

सी लिंकवर स्टंट करणे पडले महागात! गायक यासर देसाईविरुद्ध गुन्हा दाखल

सुप्रसिद्ध पार्श्वगायक यासर देसाई यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गायक मुंबईच्या वरळी सी लिंकवर निर्भयपणे उभा असल्याचे दिसून येत आहे.

सी लिंकवर स्टंट करणे पडले महागात गायक यासर देसाईविरुद्ध गुन्हा दाखल
Yasser Desai Viral Video
Edited Image

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक असे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कधी धबधब्याच्या जवळ तर कधी रस्त्याच्या मधोमध व्हिडिओ बनवू लागतात. पण, जेव्हा एखादा प्रसिद्ध सेलिब्रिटी असे करतो तेव्हा चाहत्यांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा असा प्रश्न निर्माण होतो. सुप्रसिद्ध पार्श्वगायक यासर देसाई यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गायक मुंबईच्या वरळी सी लिंकवर निर्भयपणे उभा असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हा धोकादायक व्हिडिओ व्हायरल होताच सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो कोणत्याही सुरक्षेशिवाय हायस्पीड ट्रॅफिकमध्ये स्टंट करत आहे. गायकाच्या या व्हिडिओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासर देसाईला अशा ठिकाणी शूटिंग करण्याची परवानगी कशी मिळाली? असा प्रश्न आता नेटीझन्स विचारत आहेत.

गायक यासर देसाईचा सी लिंकवर धोकादायक स्टंट - 

 

हेही वाचा - 'सॉरी नॉट प्राडा, माझी चप्पल रिअल कोल्हापूरची'; करीना मिरवली कोल्हापुरी चप्पल

यासर देसाईविरुद्ध गुन्हा दाखल - 

दरम्यान, यासर देसाईचा व्हिडिओ व्हायरल होताच, मुंबई पोलिसांनी गायकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 285, 281 आणि 125 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा - कारागृह वाईट होता की बिग बॉस?; फराह खानच्या प्रश्नावर मुनावर फारुकी म्हणाला...

गायक यासर देसाई यांनी 2016 मध्ये 'बेईमान लव्ह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये गायन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आकांक्षा शर्मासोबत 'मैं अधुरा' ही दोन गाणी आणि सुकृती कक्करसोबत 'मेरे पीचे हिंदुस्तान है' हे दुसरे गाणे गायले आहे. 


सम्बन्धित सामग्री