Wednesday, August 20, 2025 04:35:07 AM

Kamal Haasan Death Threat: कमल हासन यांना जीवे मारण्याची धमकी

या धमकीनंतर कमल हासन यांचे चाहते आणि पक्ष कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याप्रकरणी चेन्नई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

kamal haasan death threat कमल हासन यांना जीवे मारण्याची धमकी
Kamal Haasan

Kamal Haasan Death Threat: तमिळ सुपरस्टार कमल हासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, मात्र यावेळी चर्चेत येण्याचे कारण त्यांचा चित्रपट नसून जीवे मारण्याची धमकी आहे. ही धमकी देणारा दुसरा कोणी नसून तमिळ अभिनेता रविचंद्रन आहे. एका यूट्यूब मुलाखतीत रविचंद्रन यांनी कमल हासन यांना अनुभवहीन राजकारणी म्हणत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकेच नव्हे तर, सनातन धर्माविरुद्धच्या त्यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे ते कमल यांचा गळा कापतील, असे धक्कादायक वक्तव्यही रविचंद्रन यांनी केले आहे.

हेही वाचा - Chak De India: शाहरुख खान नाही, तर ‘चक दे इंडिया’ची मुख्य भूमिका मिळाली होती ‘या’ कलाकाराला; जाणून घ्या

या धमकीनंतर कमल हासन यांचे चाहते आणि पक्ष कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याप्रकरणी चेन्नई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी अभिनेत्याला अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. कमल हासन यांनी अलीकडेच तमिळ स्टार सूर्याच्या एनजीओच्या 15 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात वक्तव्य केले होते की, 'केवळ शिक्षणच देश बदलू शकते. शिक्षण हे असे शस्त्र आहे, जे हुकूमशाही आणि सनातनचे बेडे तोडू शकते. कोणतेही शस्त्र उचलू नका, शिक्षण पुरेसे आहे.' यानंतरच मोठा वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. 

हेही वाचा - Wednesday Season 2 Part 2 : नेटफ्लिक्सवरील वेन्सडे सीझन 2 चा दुसरा भाग पुढील महिन्यात होतोय रिलीज; तारीख जाहीर

कमल हासन हे उत्तर अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, नृत्य दिग्दर्शक, गायक, निर्माते आणि राजकारणी आहेत. अभिनयासाठी त्यांनी आतापर्यंत 4 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 19 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. त्यांनी तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम, कन्नड, बंगाली, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये भूमिका केल्या आहेत. 2018 मध्ये त्यांनी मक्कल नीडी मय्यम हा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला.
 


सम्बन्धित सामग्री