Thursday, August 21, 2025 02:54:57 AM

Upcoming Marathi Film Teaser: सत्यकथेवर आधारित 'आता थांबायचं नाय!' मराठी चित्रपटाचे टीझर प्रदर्शित

मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी ओळखल्या जातात. अशातच, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 'आता थांबायचं नाय' या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

upcoming marathi film teaser सत्यकथेवर आधारित आता थांबायचं नाय मराठी चित्रपटाचे टीझर प्रदर्शित

मराठी सिनेमे नेहमीच त्याच्या विषयांसाठी आणि सादरीकरणासाठी ओळखल्या जातात. अशातच, गेल्या काही वर्षात महिलाप्रधान सिनेमांकडे मनोरंजनसृष्टीचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलंय. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ यांनी प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत 'आता थांबायचं नाय' या दमदार सिनेमाचा दर्जेदार टीजर. महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरण ह्या गोष्टींना प्रोत्साहन देत, तसेच सामान्य माणसाच्या दैनंदिन कष्टाळू जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
           स्वतः पेक्षा जास्त कुटुंबाला महत्व देणारी, प्रत्येक क्षेत्रात स्वतःच अस्तित्व शोधणारी प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे 'स्त्री'. टीझर पाहिल्यावर हा चित्रपट प्रेरणा आणि मनोरंजन याचं उत्तम मिश्रण असल्याचे समजते. महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. शिवराज वायचळ यांनी 'आता थांबायचं नाय!' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

हेही वाचा: Famous Women Centric Films: झिम्मा, बाईपण भारी देवा, क्वीन... 'या' आहेत प्रसिद्ध महिला-प्रधान चित्रपट
 


'हे' कलाकार दिसतील मुख्य भूमिकेत:

भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगांवकर आणि आशुतोष गोवारीकर मुख्य भूमिकेत आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत. 


           इतकंच नव्हे, तर सर्वांची आवडती ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ह्यांची खास झलक या टिझरमध्ये आपल्याला पहायला मिळते. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीदेखील आपल्याला विशेष भूमिकेत दिसणार आहेत. एका कणखर आणि स्वतंत्र महिलेची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता प्राजक्ता हनमघर यांनी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले आहे. एकंदरीतच, महिलांमध्ये एकजुटीची आणि प्रोत्साहनाची भावना असल्याचे संदेश आपल्याला या चित्रपटाच्या टिझर मधून पाहायला मिळतो. 'आता थांबायचं नाय!' हा चित्रपट भावनिक तर आहेच, पण त्या सोबतच प्रेरणादायक आणि मनोबल वाढवणारा आहे. तसेच पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. 


ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणतात:

"मला वाटतं की जितकं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते तितकं अजून कोणीच घेऊ शकत नाही. आज ती प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, सर्वांना सोबत घेऊन प्रगती करत आहे. आपल्या टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे, आज खास महिलादिनी आपण निश्चय करूयात की आपण असंच एकमेकांना समजून घेत एकमेकांच्या प्रगतीचे आणि समृद्धीचे खुल्या मनाने साक्षीदार होऊया" असे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या. 

हेही वाचा: International Women's Day: भारताच्या इतिहासाला आकार देणाऱ्या महाराष्ट्रातील कणखर महिला
 

निर्माती निधी हिरानंदानी म्हणतात: 

निर्माती निधी हिरानंदानी म्हणतात, "मी सुद्धा एक खंबीर आणि सशक्त स्त्री आहे. त्यामुळे मला प्राजक्ता हनमघरची भूमिका मनापासून आवडली. मला वाटतं की आपल्याला लोकांकडून आदर आणि प्रतिष्ठेची वागणूक अपेक्षित असेल, तर आपण त्या शिकवणीची सुरुवात आपल्या मुलांपासूनच करणं गरजेचं आहे" 


                       झी स्टुडिओज् यांनी मराठी सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा , या महाराष्ट्र दिनानिमित्त, 1 मे 2025 रोजी 'आता थांबायचं नाय!' हा दमदार चित्रपट आपल्या चित्रपटगृहात पाहायला मिळेल. 


सम्बन्धित सामग्री