Wednesday, August 20, 2025 09:12:40 PM

मराठी नाही बोलली तर भोकं पडणार का?, केतकी चितळेचं वादग्रस्त विधान चर्चेत

अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. केतकीने मराठी भाषेविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.

मराठी नाही बोलली तर भोकं पडणार का केतकी चितळेचं वादग्रस्त विधान चर्चेत

मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. केतकीने मराठी भाषेविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. तिच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मराठी नाही बोलली तर भोकं पडणार का? असं वक्तव्य चितळेने केले आहे. 

मनसेने महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्याचे चित्र पाहायला मिळते. यावरुन वेगवेगळी प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. महाराष्ट्रात मराठीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातो. तर दुसरीकडे चितळे मराठीबद्दल बेताल वक्तव्य करत आहे. केतकी म्हणाली, लोक यातून आपली असुरक्षितता दाखवत आहेत. मराठीतच बोल. मराठी कसं येत नाही, असा दाबव टाकला जात आहे. अरे समोरची व्यक्ती मराठीत बोलेलं किंवा बोलणार नाही. समोरची व्यक्ती मराठी भाषेत बोलली नाही तर मराठी भाषेचं नुकसान होणार आहे का? असा थेट सवाल केतकी चितळेने केला आहे. तसेच समोरची व्यक्ती मराठी बोलली नाही तर भोकं पडणार आहेत का? मराठी बोलण्याचा दबाव टाकून तुम्ही तुमची स्वत:ची असुरक्षितता दाखवत आहात. कोणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडत नाही, असंही केतकी चितळेनं म्हटलंय. 

हेही वाचा: मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले दुसरे पंतप्रधान बनले

ठाकरे बंधूंनी मराठी बोलण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे तिने ठाकरे कुटुंबाला टार्गेट केलं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि नाती मराठी बोलण्यासाठी सांगत आहेत. क्रिशन, कॅथलिक शाळेत जाऊन मराठी भाषेविषयी बोलत आहेत. परंतु ठाकरेंची मूल का मशिनरी शाळेत शिकली. पण नाही हे सगळं सोडून सगळ्यांना ज्ञान झाडत फिरणार अशी टीका केतकीने ठाकरे कुटुंबावर केली आहे. 

मागील काही दिवसांपासून आपण मराठी भाषा बोलली नाही म्हणून झालेले वाद, भांडण पाहत आहोत. मनसे नेते महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा आग्रह करत आहेत. तसेच ठाकरे बंधू मराठीबद्दल संवेदनशील असलेले पाहायला मिळत आहेत. अशातच केतकी चितळेने ठाकरे कुटुंबावर मराठी भाषेवरुन टीका केली आहे. 


सम्बन्धित सामग्री