Wednesday, August 20, 2025 09:32:55 AM

Maharashtra Dam : राज्यातील 11 मोठी धरणे पूर्ण भरली; 19 ऑगस्टपर्यंत कुठल्या धरणात पाणी किती?

Maharashtra Dam : महाराष्ट्रात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. काही नद्यांच्या पाण्याने पुराची पातळी गाठली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

maharashtra dam  राज्यातील 11 मोठी धरणे पूर्ण भरली 19 ऑगस्टपर्यंत कुठल्या धरणात पाणी किती

Maharashtra Dam : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने चांगली उघडीप दिली होती. पण मागील काही दिवसांपासून श्रावणसरींनी जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील बहुतांश भागात अनेक नद्यांचे पाणी पुराच्या पातळीकडे निघाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. जाणून घेऊया, आज 19 ऑगस्टपर्यंत कोणत्या धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे..

आतापर्यंत राज्यातील उजनी, राधानगरी, तुळशी, पेण, भाटघर, आढळा, सीना, पांझरा, विहार, चासकमान, बारावे ही धरणं 100 टक्के भरली आहेत. तर आणखी काही धरणांचा काही दिवसांत या यादीत समावेश होऊ शकतो. काही धरणे 90 टक्क्यांहून अधिक तर काही धरणे 85 टक्क्यांच्यावर भरली आहेत.

हेही वाचा - Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार; कोणते रस्ते बंद, कोणते सुरू आणि लोकल सेवेच वेळापत्रक जाणून घ्या

आता विभागनिहाय धरणसाठा पाहिला तर मुंबई, कोकण विभागातील धरणांपैकी मोडक सागर धरण 91.74 टक्के, तानसा धरण 99.26 टक्के, म.वैता 97.51 टक्के, भातसा धरण 93.00 टक्के, हेटवणे धरण 97.34 टक्के, पानशेत धरण 96.76 टक्के, खडकवासला धरण 66.84 टक्के, मुळशी धरण 93.48 टक्के भरले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण 96 टक्क्यांच्या आसपास भरले आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी, कासारी, कडवी, पाटगाव, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी, धोम ही लहान धरणे 95 टक्क्यांहून अधिक भरली आहेत. या धरण क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या भागांमध्ये अलर्ट जारी केलेला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, सिंदुदुर्ग, मुंबई येथे धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, कर्नाटकातील अलमट्टी धरण क्षेत्रातही पाऊस असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. येथील पाणी वेगाने वाढू लागल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांची चिंता वाढते.

तसेच, नाशिक विभागातील गंगापूर धरण (Gangapur Dam) 84.78 टक्के, दारणा धरण 85.93 टक्के, करंजवण धरण 92.37 टक्के, गिरणा धरण 69.93 टक्के, हतनूर धरण 41.96 टक्के, ऊकई धरण 73.35 टक्के, भंडारदरा धरण 92.27 टक्के तर निळवंडे धरण 85.77 टक्क्यांवर आहे. 
तसेच मराठवाडा आणि नागपूर विभागातील धरणांपैकी जायकवाडी धरण एकूण 96.14 टक्के, उजनी धरण एकूण 102.18 टक्के, कोयना धरण 93.64 टक्के, अलमट्टी धरण 91.16 टक्के, मांजरा धरण 93.22 टक्के, सिद्धेश्वर धरण 97.39 टक्के, गोसेखुर्द धरण 48.07 टक्के, तोतला डोह 68.34 टक्के, खडकपूर्ण 87.87 टक्के, काटेपूर्णा 85.86 टक्के, उर्ध्ववर्धा 66.16 टक्के भरले आहे.

हेही वाचा - Pune Rain : पावसानं तोंडचं पाणी पळवलं! आता तरी Work From Home द्या.. IT कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांना मागणी


सम्बन्धित सामग्री