Thursday, August 21, 2025 02:53:46 AM

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार नाही

भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचे दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर आता मोठा खुलासा झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार नाही
Edited Image

नवी दिल्ली: अमेरिकेच्या शुल्क आणि दंड धोरणानंतर, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचे दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर आता मोठा खुलासा झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने स्पष्ट केले आहे की, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत.

भारताचा रशियासोबत व्यापार सुरू आहे - 

रिफायनरीजना रशियन पुरवठादारांकडून सतत तेल मिळत आहे. खरेदीचे निर्णय हे केवळ किंमत, तेलाची गुणवत्ता, साठवणूक, वाहतूक आणि इतर आर्थिक घटकांच्या आधारे घेतले जातात. रशिया दररोज सुमारे 9.5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करतो आणि त्यापैकी 4.5 दशलक्ष बॅरल तेल निर्यात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात रशियन तेलाला मोठे महत्त्व आहे.

हेही वाचा - ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा परिणाम! भारताने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमान खरेदीस दिला नकार

तथापी, सूत्रांनी एएनआयला सांगितले की, रशियन तेलावर बंदी घालण्यात आलेली नाही. त्याऐवजी G7 आणि युरोपियन युनियनने 'किंमत मर्यादा' यंत्रणा लागू केली आहे. ही यंत्रणा जागतिक पुरवठा आणि बाजार स्थिरतेच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. भारताने एक जबाबदार जागतिक ऊर्जा भागीदार म्हणून आपली भूमिका पार पाडली आहे. किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारताने भूमिका बजावली आहे. 

हेही वाचा - Trump Strikes Again: ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने कोसळले आशियाई बाजार; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण

दरम्यान, रशियाकडून तेल खरेदी बंद झाल्याच्या अफवा सध्या तरी तथ्यहीन ठरल्या आहेत. भारताचा रशियासोबत तेल व्यवहार सुरूच आहे. हे व्यवहार जागतिक पातळीवरील कायदेशीर आणि आर्थिक निकषांनुसार चालू आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री