Wednesday, August 20, 2025 11:55:30 PM

माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह धिंडसा यांचे निधन

सुखदेव सिंग धिंडसा यांनी वयाच्या 89 व्या वर्षी मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून आजारी होते.

माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह धिंडसा यांचे निधन
Sukhdev Singh Dhindsa
Edited Image

पंजाब: माजी केंद्रीय मंत्री आणि शिरोमणी अकाली दल (टकसाली) चे ज्येष्ठ नेते सुखदेव सिंग धिंडसा यांचे निधन आहे. सुखदेव सिंग धिंडसा यांनी वयाच्या 89 व्या वर्षी मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून आजारी होते. सुखदेव सिंग धिंडसा हे पूर्वी शिरोमणी अकाली दल (एसएडी) मध्ये होते. ते बराच काळ अकाली दलाचे संरक्षक होते. धिंडसा यांनी शिरोमणी अकाली दलाची (टकसाली) स्थापन केली. त्यानंतर त्यांचा पक्ष पुन्हा शिरोमणी अकाली दलात विलीन केला.

हेही वाचा - मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट! खरीप पिकांवरील MSP वाढवली

अटल बिहारी सरकारमध्ये सुखदेव सिंग धिंडसा केंद्रीय मंत्री - 

सुखदेव सिंग धिंडसा यांनी पंजाबच्या संगरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. ते अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री होते. प्राप्त माहितीनुसार, त्यांना 3 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा - मोठी बातमी! पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या 6 राज्यांमध्ये उद्या पुन्हा मॉकड्रिल

सुखदेव सिंग बादल यांनी व्यक्त केला शोक - 

अकाली दल प्रमुख सुखदेव सिंग बादल यांनी ट्विटरवर पोस्ट करून सुखदेव सिंग धिंडसा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटलं आहे की, 'सरदार सुखदेव सिंग धिंडसा साहिब यांच्या निधनाने मन खूप दुःखी आहे. धिंडसा साहेबांनी शिरोमणी अकाली दलात राहून पंजाब आणि देशाची दीर्घकाळ सेवा केली, जी नेहमीच लक्षात राहील. मी वैयक्तिकरित्या आणि शिरोमणी अकाली दलाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि देवाला प्रार्थना करतो की दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे. तसेच कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी.'
 


सम्बन्धित सामग्री