Wednesday, August 20, 2025 07:36:21 AM

Mumbai Rain Update : मुंबईत पावसानं केली दैना! मुंबईकर बेहाल; गुडघाभर पाण्यातून नागरिकांची वाटचाल

मुंबई पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये आज, 19 ऑगस्ट 2025 रोजी बंद ठेवण्यात आल्याचे राज्य सरकारनं जाहीर केले आहे.

mumbai rain update  मुंबईत पावसानं केली दैना मुंबईकर बेहाल गुडघाभर पाण्यातून नागरिकांची वाटचाल

मुंबई : मुंबई पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये आज, 19 ऑगस्ट 2025 रोजी बंद ठेवण्यात आल्याचे राज्य सरकारनं जाहीर केले आहे. याबाबत मुंबई महापालिकेने एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच खासगी कार्यालये, संस्था, आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

भारतीय हवामान खात्याने आज, मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अति मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून महापालिकेने घोषित केल्यानुसार, सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये तसेच पालिका कार्यालयांना आज सुट्टी आहे.

शिवाय, मुंबईतील सर्व खासगी कार्यालये, संस्था आणि आस्थापनांना महापालिकेच्या वतीने आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत काल 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 ते आज 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पावसाची सर्वाधिक नोंद झालेल्या ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली आहे.   
 


सम्बन्धित सामग्री