Wednesday, August 20, 2025 09:24:18 AM

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

maharashtra cabinet decision  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटर, कोल्हापूरातील औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता अशा विविध मुद्द्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. 

हेही वाचा : Vice President Post Candidate : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; 'इंडी'नं केलं नाव जाहीर

राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे निर्णय -

मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ.(महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.697/3/6 मधील 2 हे. 50 आर जमीन  देणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला - कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर 29 दिवस तत्त्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)


सम्बन्धित सामग्री